Saturday, January 18, 2025 05:14:38 AM

Buldhana
बुलढाण्यातील धाड परिसरात तणावपूर्ण शांतता

बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील परिस्थितीवर पोलिसांचे नियंत्रण आहे.

बुलढाण्यातील धाड परिसरात तणावपूर्ण शांतता

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील परिस्थितीवर पोलिसांचे नियंत्रण आहे. धाड परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. जाळपोळीनंतर रस्त्यावरील जळालेली वाहने पोलिसांनी बाजूला केली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील धाड गावात टिपू सुलतान जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान दोन गटात तुफान दगडफेक आणि जाळपोळ झाली. धाड पोलिसांसह बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांची अतिरिक्त तुकडी धाड परिसरात दाखल झाली असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून समाजकंटकांची धरपकड सुरू होती. तर पोलिसांनी जाळपोळीनंतर रस्त्यावर पडलेली जळालेली वाहने स्वतः बाजूला करत नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

 

नेमकी घटना काय ?

बुलढाण्यातील धाड गावात टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकी दरम्यान दोन गटात राडा झाला. दोन गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर जाळपोळ झाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन धाड पोलिसांसह बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांची अतिरिक्त तुकडी धाड परिसरात दाखल झाली. पोलिसांनी घटनास्थळ पोहचताच परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत समाजकंटकांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांना शांततेचे आवाहन केले आहे.   

           

सम्बन्धित सामग्री