नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील सीमेवर डेमचोक आणि डेपसांग या दोन्ही देशांतील तणावाचे कारण ठरलेल्या ठिकाणावरून सैन्य माघारीस भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया २८-२९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांत नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याचा एक करार झाला. यात दोन्ही देशांनी सैन्य काही अंतरापर्यंत मागे घेण्यावर एकमत झाले होते. रशियातील कझानमध्ये ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात २३ ऑक्टोबरला याबाबत चर्चा होत एकमत झाले होते.