मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. एसआयटीने हा मोक्का लावला असून त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे.
हेही वाचा : धाराशिव जनआक्रोश मोर्चातून धस यांचा गौप्यस्फोट
संतोष देशमुख यांना न्याया मिळावा यासाठी राज्यभरातून जनआक्रोश मोर्चाचे आंदोलन केले जात आहे. यातच आता महत्त्वाची माहिती समोर आली. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व 7 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातली सर्वात मोठी कारवाई झाली आहे. प्रतीक घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, महेश केदार, जयराम चाटे, विष्णू चाटे याच्यांवर मकोका लावण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मकोका कायदा म्हणजे काय?
मकोका म्हणजे 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा'
मकोका गुन्ह्यात कमीत कमी 5 वर्षांची शिक्षा
आरोपींना 5 लाखांचा दंड होऊ शकतो
जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा देखील होऊ शकते
आरोपींच्या मालमत्ता जप्त होऊ शकतात
मकोका गुन्ह्यात लवकर जामीन मिळत नाही
जास्तीत जास्त शिक्षा गुन्ह्याच्या स्वरुपावरुन होते
संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मकोका महत्वाचा
मकोका लागल्यानं पोलिसांना 180 दिवस मिळणार
खंडणी, अपहरण, हप्ते वसुली, सुपारी देणं, तस्करीसारख्या गुन्ह्यांमध्ये मकोका
मकोका लावण्यासाठी 2 किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी असावी लागते
हेही वाचा : गृहमंत्री जागे आहात का?; जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल
वाल्मिक कराडवर मकोका नाही
संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतो आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. मात्र कराडवरही मकोका लावण्याची मागणी होत आहे.परंतु वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटी आणि सीआयडीकडे दिला आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती.