Saturday, January 18, 2025 05:59:35 AM

Vegetables Price Increased
गृहिणींचे बजेट वाढणार : भाज्यांचा दर वधारला

भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत

गृहिणींचे बजेट वाढणार  भाज्यांचा दर वधारला

नवी मुंबई : सर्वसामान्य महागाईने त्रस्त आहे. त्यात भर म्हणून आता भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. नवी मुंबईच्या बाजारपेठेतील भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. बाजारात फरसबी 32 रूपये किलोवर गेले आहे. घेवडा हा 39 रूपये किलोवर पोहोचला आहे. काकडी 25 रूपये किलोने बाजारात मिळत आहे. शेवग्याच्या शेंगाला भाव आला आहे. शेवगा 125 रूपये किलोने विकला जात आहे.

 

हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळा सुरू झाल्याने रब्बी हंगामात पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांचे प्रमाण वाढले आहे. हिवाळा सुरू झाल्यावर गाजर, वाटाणा या भाज्यांची मागणी वाढते. त्यामुळे त्यांच्या दरात वाढ होते. गाजर 58 रूपये, वाटाणा 75 रूपये, फ्लॉवर 17 रूपयाने झाला आहे. गवार 57 रूपये, ढोबळी मिरची 27 रूपये, भेंडी 30 रूपये, चवळी शेंग 24 रूपये, कारली 23 रूपये, सुरण 49 रूपये,  तोंडल 40 रूपये, वांगी 29 रूपये किंमचीने विकली जात आहेत.

भाज्यांच्या दरांप्रमाणेच पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. कोथिंबीर 12 रूपये, मेथी 10 रूपये, पालक 12 रूपये, कांदापात 10 रूपये, शेपू 12 रूपये आणि मुळा 50 रूपये दराने विकला जात आहे. भाजीपाल्यांचा दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

भारतात महागाईचा दर वाढत आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर  भारतीय रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेले 6 टक्क्यांच्या वर पोहचला आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 6.21 टक्क्यांवर गेला. तो दर गेल्या 14 महिन्यातील उच्चांकी दर होता. महागाईचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य जनतेला बसत असतो.   


सम्बन्धित सामग्री