Tuesday, December 10, 2024 11:31:24 AM

Diwali Festival For tribals
उत्सवाची शिदोरी १५० कुटुंबियांच्या दारी

म्हसरोळी गावातील आदिवासींची दिवाळी गोड, गारद फाउंडेशन आणि 'सद्गुरु कृपा ही केवलम' यांचा अभिनव उपक्रम

उत्सवाची शिदोरी १५० कुटुंबियांच्या दारी 


पालघर : पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील म्हसरोळी ता. विक्रमगड येथील आदिवासी समाजातील १५० कुटुंबाना  दिवाळीनिमित्त धान्यवाटप करण्यात  आले. 'सद्गुरु कृपा ही केवलम' आणि 'गारद फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी हा उपक्रम राबवण्यात आला. 

दिवाळी हा सण समाजातील सर्व स्तरावर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु अशा या आनंदाचा सोहळ्यात हातावर पोट असलेल्या या दुर्गम भागातील कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने 'गारद फाउंडेशन' आणि 'सद्गुरु कृपा ही केवलम' यांच्या संयुक्त विद्यमाने १५० कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले ज्यामध्ये तांदूळ, गहू, डाळ आणि तेल याशिवाय अनेक गोष्टींचा समावेश होता. तसेच विधवा महिलांना विशेष भेट आणि त्यांच्या आर्थिक गरजेनुसार रोख रक्कम , पुरुषांसाठी नवीन चपला अशी उत्सवाची शिदोरी देण्यात आली. याव्यतिरिक्त, धोदाडेपाडा अंगणवाडी (मानपाडा) येथील शाळांमधील शंभरहून अधिक लहान मुलांना आवडीचा खाऊ देण्यात आला. 

"दिवाळी सणाच्या निमित्ताने हे धान्य वाटप करुन जे देवाने आपल्याला दिले आहे त्याचाच एक वाटा देत आहोत" असे उद्गार काढत 'सद्गुरु कृपा ही केवलम' च्या डॉ. राधिका बंका यांनी या आदिवासी कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाचा प्रकाश पेरला.

या कार्यक्रमासाठी अश्विन वोरा, भगवानभाई पटेल, दीपक पारेख, डॉ. राधिका बंका, डॉ.अभय नेने, डॉ.अंशिता सोनावाला , डॉ.जतीन कोठारी, डॉ.मनोज चड्ढा  , डॉ.फूलरेणू चौहान ,सचिन अलमेल, हंसाबेन पटेल, हितेश गांधी, जसुमतीबेन देसाई, किशोरभाई शहा, महेंद्र देढिया, नम्रता गाला, नुपूर चौधरी, पंकज भाई, प्रविण कोठारी, प्रविणभाई तन्ना, राजेश दवे, राकेश बंसल, समीर नवघरे, समीर देसाई, श्रेया नवघरे, विनीत गाला, सानिका पराडकर हे सर्व उपस्थित होते तर या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा 'गारद फाऊंडेशन'चे सदस्य तथा स्वयंसेवकांनी उत्तमरित्या सांभाळली.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo