नाशिक: नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटना दिवसानुदिवस वाढत चालल्या आहेत. नाशिक शहर हे गुन्हेगारीचं शहर बनत कि काय अशी भीती नाशिकरांमध्ये आहे. त्यातच आता नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यानेच बँकेची फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे. कर्मचाऱ्यानेच बँकेला कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला आहे.
काय आहे प्रकरण?
शहरातील पंजाब नॅशनल बँकेच्या कॅनडा कॉर्नर शाखेत हॉल इन्चार्ज म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच गेल्या अनेक दिवसांपासून जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून कोटी रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष बाब म्हणजे बनावट कागदपत्रांच्या आधारे विमाधारक आणि मयत बँक खातेदारांचे 106 खोटे वारसदार दाखवून हा अपहार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत बँकेत नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनीच संपूर्ण घोटाळा उघडकीस आणला आहे.
दिपक कोळी असे अटक केलेल्या संशयिताच नाव असून त्याने गुन्हा कबूल केला असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. दीपक कोळी याला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेतील दाव्याची रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खोटे वारसदारांच्या खात्यांवर प्राप्त करून एकूण दोन कोटी बारा लाख रुपयांचा अपहार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.
काय आहे जीवन ज्योती विमा?
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही एक शुद्ध मुदत विमा योजना आहे. जी कोणत्याही कारणामुळे मृत्यूसाठी जीवन संरक्षण प्रदान करते. सतत संरक्षण सुनिश्चित करून, वार्षिक नूतनीकरण करण्याच्या पर्यायासह, हे एका वर्षासाठी उपलब्ध आहे.