Monday, February 17, 2025 12:30:14 PM

The national anthem written by Tagore was not acce
टागोरांनी लिहिलेलं राष्ट्रगीत रामगिरी महाराजांना पटेना

आजवर रामगिरी महाराजांचे अनेक वक्तव्य चर्चेत राहिलेत. त्यातच ते आता थेट राष्ट्रगीतावर घसरल्याचे पाहायला मिळतंय. गोधा धामचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय.

टागोरांनी लिहिलेलं राष्ट्रगीत रामगिरी महाराजांना पटेना

छत्रपती संभाजीनगर: आजवर रामगिरी महाराजांचे अनेक वक्तव्य चर्चेत राहिलेत. त्यातच ते आता थेट राष्ट्रगीतावर घसरल्याचे पाहायला मिळतंय. गोधा धामचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. परंतु आता त्यांनी थेट राष्ट्रगीतावर टीका केल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. 'देशाचे राष्ट्रगीत 'जण-गण-मन' नाही तर वंदे मातरम पाहिजे' असं रामगिरी महाराज म्हणालेत. त्यामुळे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं राष्ट्रगीत रामगिरी महाराजांना पटेनास झालाय कि काय असा प्रश्न देखील निर्माण झालाय. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

याबाबत सविस्तर: 

मिशन अयोध्या चित्रपटाचे लॉन्च दिनांक  24 जानेवारी 2025 रोजी एकाच वेळी महाराष्ट्रात होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रामगिरी महाराज यांनी उपस्थिती लावली होती. आणि याप्रसंगीच त्यांनी मनोगत व्यक्त करताना 'देशाचे राष्ट्रगीत 'जण-गण-मन' नाही तर वंदे मातरम पाहिजे' असं वक्तव्य केलं. 

काय म्हणाले रामगिरी महाराज? 
आपण लॉन्चिंगच्या अगोदर राष्ट्रगीतासाठी उभं राहिलो. या राष्ट्रगीताचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती परंतु हे गीत रविंद्रनाथ टागोर यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी 1911 मध्ये लिहिलं होतं. अशा गीताला आपलं राष्ट्रगीत मानणं योग्य नाही, यात बदल व्हायला हवा, असं वक्तव्य रामगिरी महाराजांनी केलं आहे. वंदे मातरम हेच आपले राष्ट्रगीत व्हावं, असं वक्तव्य महंत रामगिरी महाराज यांनी केलं आहे. 

दरम्यान या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळी असून याचे नेमके काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे. 


सम्बन्धित सामग्री