Wednesday, November 13, 2024 09:12:10 PM

Pune Police
पुणे पोलिसांनी लाज घालवली

रस्त्यावर बेडशिट विक्री करणार्‍या विक्रेत्याकडून १४ हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही २३ बेडशिट घेणाऱ्या दोघा पोलीस शिपायांना पोलीस उपायुक्त झोन ४ यांनी निलंबित केले.

पुणे पोलिसांनी लाज घालवली

पुणे : रस्त्यावर बेडशिट विक्री करणार्‍या विक्रेत्याकडून १४ हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही २३ बेडशिट घेणाऱ्या दोघा पोलीस शिपायांना पोलीस उपायुक्त झोन ४ यांनी निलंबित केले. पोलीस अंमलदार सुनिल भगवान कुसाळकर, आणि संजय महादेव आसवले अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. दोघेही विमानतळ पोलीस स्टेशन नेमणूकीला होते. हा प्रकार १७ सप्टेबर रोजी विमाननगर येथे घडला होता. वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी तक्रार दिल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केली आहे.

विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात काहीजण बेडशिट विक्रीसाठी थांबले होते.१७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पोलीस शिपाई सुनिल कुसाळकर व संजय आसवले तेथे आले.तुम्ही का थांबलात इथे थांबायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल असे सांगून त्यांच्याकडील ६० बेडशिट स्कार्पिओ गाडीमध्ये टाकून निघून गेले. त्यानंतर विक्रेत्यांकडून त्यांनी १४ हजार रुपये हप्ता म्हणून घेतले.त्यानंतर अल्थमेश व त्यांच्या मित्रांनी बेडशिटची मागणी केल्यानंतर त्यांनी ६० बेडशिटपैकी ३७ बेडशिट परत दिले.२३ बेडशिट स्वत:कडे ठेवून घेतले होते. याबाबत वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी विमानतळ पोलीस स्टेशन यांना १८ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून पोलीस उपायुक्त यांनी कारवाई केली आहे. 


 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo