बुलढाणा: सद्या देशात आणि राज्यात सुरूय तरी काय? असा प्रश्न सर्वानाच पडलाय. दररोज नवनवीन आजार डोकं वर काढताय. शेगावात टक्कल आजाराने धुमाकूळ घातलेला असतांनाच आता ब्लू बेबी सिंड्रोम आजाराचा धोका वाढत असल्याचं समोर आलाय. यामुळे आता लहानग्यांचे आरोग्य धोक्यात असल्याने पालक मात्र चिंतेत आहे. बुलढाण्यात शेगावमध्ये टक्कल आजाराने थैमान घातलाय. त्यातच आता चिमुकल्यांवर देखील ब्लू बेबी सिंड्रोम आजाराचे सावट असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे केंद्रीय भूजल मंडळाच्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवालात, संबंधित जिल्ह्यातील भूजलात विषारी पदार्थ असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचं देखील समोर आलाय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय आहे ब्लू बेबी सिंड्रोम?
ब्लू बेबी सिंड्रोम (Blue Baby Syndrome) म्हणजेच त्यातल्या छोट्या बाळांमध्ये ऑक्सिजन कमी होण्याची स्थिती आहे, ज्यामुळे त्यांच्या त्वचेचा रंग निळसर होतो. या अवस्थेतील बाळांना 'ब्लू बेबी' असेही म्हटले जाते. यामध्ये रक्तप्रवाहामध्ये ऑक्सिजनची कमी होण्यामुळे शरीरातील विविध अवयवांपर्यंत आवश्यक ऑक्सिजन पोहोचत नाही, ज्यामुळे त्वचा निळसर दिसू लागते.
ब्लू बेबी सिंड्रोम मुख्यत: दोन कारणांमुळे होऊ शकतो:
हृदयाचे दोष: काही वेळा जन्मानंतर बाळांच्या हृदयामध्ये त्रुटी असू शकतात, ज्यामुळे रक्त शुद्ध होऊन शरीरात पसरत नाही. याला 'हृदयाचे जन्मजात दोष' असे म्हणतात.
पाणी वायू श्वसनाच्या समस्या: काही बाळांना जन्मत: श्वसनाची समस्या असू शकते, ज्यामुळे त्यांच्या फुफ्फुसांमध्ये योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होत नाही.
ब्लू बेबी सिंड्रोम असलेल्या बाळांना त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. वेळेवर उपचार न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. डॉक्टर यासाठी ऑपरेशन, औषध उपचार किंवा श्वसन सहाय्य देऊन उपचार करतात. हे एक गंभीर स्थिती आहे, म्हणून या प्रकारच्या लक्षणांसाठी वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दरम्यान आता या ब्लू बेबी सिंड्रोम आजारामुळे चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात असल्याने पालक आधी चिंतेत आहे. त्यामुळे आता या सर्व स्थितीला आरोग्य विभाग कसं हाताळणार आणि या सर्व परिस्थितीवर कसे नियंत्रण मिळणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणारे.