मुंबई : मुंबईत वाशी ते मानखुर्द दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवाशांचे नाहक हाल झाले आहेत. अशातच रिक्षाचालकांकडून अधिक भाड्याची आकारणी होत आहे. त्यामुळे नागरिकांना शनिवारी सकाळी सकाळी प्रवासात अडचणी निर्माण झाल्या आहेत.