मुंबई : बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्युपत्रातून त्यांच्या कुटुंबाला एआय-आधारित गुंतवणूक व्यासपीठ देण्यात आले. ही माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, या व्हायरल बातमीसंदर्भात डीजीआयपीरआरने एक पोस्ट शेअर केली असून याबाबत आर्थिक फसवणुकीची शक्यता असल्याचे सायबर तज्ञांनी सुचवल्याचे म्हटले आहे. त्यांनी एक्स पोस्टवर नमूद केले आहे की,
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने सोशल मीडियावर एक खोटी बातमी पसरवली जात आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाला 'इन्व्हर्टेक्स फिनेवॉक्स' नावाचा गुंतवणुकीचा प्लॅटफॉर्म दिला असल्याचा दावा त्यामध्ये केला आहे.
वर उल्लेख केलेला प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती मागतो. हा आर्थिक फसवणूक करण्याचा एक प्रयत्न असल्याचा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.
लोकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणे या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे.
हेही वाचा : Ajit Pawar Death Mystery: 'अजितदादांच्या मृतदेहावर सूज अन्...'; डॉक्टरांच्या हवाल्याने रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
काय आहे प्रकरण
व्हायरल होणाऱ्या बातमीसंबंधीत “अजित पवार गुंतवणूक प्लॅटफॉर्म” या शब्दांसाठी कीवर्ड शोधला असता असे आढळले की, कोणत्याही वृत्त वेबसाइटवरून कोणतेही वृत्त अहवाल नाही. लेखात उल्लेख केलेल्या कथित गुंतवणूक प्लॅटफॉर्म “इन्व्हर्टेक्स फाइनव्होक” या शब्दावर क्लिक केल्यावर एका संशयास्पद वेबपेजवर नेण्यात आले. ज्यामध्ये वैयक्तिक तपशील, वापरकर्ते आणि सेलिब्रिटींकडून समर्थन, निधीचे अस्पष्ट वर्णन आणि जलद नोंदणी करण्याच्या विनंत्या विचारल्या गेल्या होत्या. ही सर्व चिन्हे घोटाळ्याकडे निर्देशित करत होती. त्यानंतर वेबसाइट स्कॅम डिटेक्टरवरून चालवली. ज्याने 12.1/100 चा ट्रस्ट स्कोअर दिला. यापूर्वीही गायिका श्रेया घोषाल आणि नेहा कक्कर यांच्या गुंतवणूक प्लॅटफॉर्मना मान्यता देण्याच्या अशाच व्हायरल बातम्या सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या होत्या.