पुणे : पुणे शहर सद्या गुन्ह्रागरीचा अड्डा बनत चाललं असल्याचं दिसून येत आहे. त्यातच आता पुणेकरारांसाठी चिंताजनक बातमी समोर येत आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा पोलिसांना फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याआधी देखील मुंबई रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवणार असल्याची धमकी पोलिसांना मिळाली होती. त्यातच आता पुणे पोलिसांना पुणे स्टेशन उडवण्याची धमकी मिळाली असल्याने सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे.
या फोन नंतर पोलिसांची यंत्रणा तात्काळ कामाला लागली आणि फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दारूच्या नशेत त्याने फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
पुणे रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवला असल्याचा पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. सकाळी 9 वाजता पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात धमकीचा फोन आल्याचा समोर आले. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ तपास करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. फोन करणारा व्यक्ती हा पिंपरी - चिंचवड भागातील रावेत येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.
या संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सागर भंडारी असे त्याचे नाव आहे. त्याचबरोबर त्याने दारूच्या नशेत पोलिसांनी फोन केल्याने पुणेकरांचा जीव मात्र टांगणीला लागला होता. या संबंधिताला आता पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.