Saturday, March 07, 2026 02:26:43 AM

Holika Dahan 2026: गर्भवती महिलासह 'या' 3 व्यक्तींनी चुकूनही पाहू नये होळीचा अग्नी; अन्यथा ओढवू शकतं मोठं संकट

होलिका दहन हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव असला, तरी शास्त्रांनुसार काही विशिष्ट व्यक्तींनी होलिका दहनाचा अग्नी पाहणे टाळले पाहिजे.

holika dahan 2026 गर्भवती महिलासह या 3 व्यक्तींनी चुकूनही पाहू नये होळीचा अग्नी अन्यथा ओढवू शकतं मोठं संकट

Holika Dahan: भारतीय संस्कृतीत होळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. 2026 मध्ये होलिका दहन 3 मार्च रोजी साजरे केले जाणार आहे. मात्र, काही ज्योतिषी आणि खगोलशास्त्रीय गणनेनुसार 3 मार्च रोजी चंद्रग्रहण असल्याने, 2 मार्चच्या संध्याकाळी होलिका दहन करणे अधिक शुभ मानले जात आहे. होलिका दहन हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव असला, तरी शास्त्रांनुसार काही विशिष्ट व्यक्तींनी होलिका दहनाचा अग्नी पाहणे टाळले पाहिजे. याचे प्रतिकूल परिणाम संबंधित व्यक्तींच्या आयुष्यावर होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

नवविवाहित महिलांच्या वैवाहिक जीवनावर होऊ शकतो परिणाम
धार्मिक समजुतीनुसार, होलिका दहनाच्या दिवशी नवविवाहित महिलांनी अग्नी पाहू नये. पौराणिक कथेनुसार, जेव्हा होलिका भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या कुंडात बसली, तेव्हा तिचा मृत्यू झाला. त्यामुळे होलिका दहन हे एका प्रकारे प्रतीकात्मक अंत्यसंस्कार किंवा चितेच्या समतुल्य मानले जाते. नवविवाहित महिलांनी हा अग्नी पाहिल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनात नकारात्मकता येऊ शकते. तसेच, या दिवशी 'राहू' हा ग्रह क्रोधित अवस्थेत असल्याने त्याचा थेट परिणाम त्यांच्या भविष्यावर होऊ शकतो.

गर्भवती महिला आणि गर्भातील बाळासाठी धोक्याचे
गर्भवती महिलांसाठी होलिका दहन पाहणे वर्ज्य मानले जाते. दहनाचा प्रखर अग्नी आणि त्यातून निघणारी ऊर्जा गर्भवती महिलेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते. विशेषतः 2026 मध्ये होलिका दहनाच्या दिवशी चंद्रग्रहण होत असल्याने हा काळ अधिक संवेदनशील आहे. अशा परिस्थितीत, गर्भवती महिलांनी बाहेर न पडता घरीच राहून देवाचे ध्यान करणे सुखकर ठरेल, जेणेकरून गर्भातील बाळावर कोणतेही नकारात्मक संस्कार किंवा परिणाम होणार नाहीत.

हेही वाचा - Shegaon Gajanan Maharaj : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन; मंदिराच्या वेळेत मोठा बदल, जाणून घ्या

लहान मुलांना अग्नीपासून दूर ठेवण्याचे आवाहन
केवळ धार्मिकच नव्हे, तर सुरक्षेच्या दृष्टीनेही 5 ते 7 वर्षांखालील लहान मुलांना होलिका दहनाच्या अग्नीपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. अग्नीच्या ज्वाळा आणि त्यातील उष्णतेचा मुलांच्या कोवळ्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. खेळण्याच्या नादात मुले आगीच्या जवळ जाऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना या धार्मिक विधीदरम्यान सुरक्षित अंतरावर ठेवणे हिताचे ठरेल.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.) 


सम्बन्धित सामग्री