Thief Of Ethics Viral News: ही तामिळनाडूमधील एक अनोखी घटना आहे. याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. सहसा चोरीच्या घटना चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण करतात. परंतु, येथे परिस्थिती वेगळी आहे. ही एका चोराची कहाणी आहे ज्याने केवळ आपली चूक मान्य केली नाही तर, ती सुधारण्यासाठी 450 किलोमीटरचा प्रवासही केला. हे वाचून तुम्हाला थोडे विचित्र वाटेल. पण तामिळनाडूतील ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे प्रकरण?
वृत्तानुसार, ही बाईक चोरीची घटना 24 फेब्रुवारी रोजी घडली. तामिळनाडू येथील रहिवासी वीरमणी यांनी त्यांची बाईक चोरीला गेल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. काही दिवसांनी, जेव्हा त्यांनी त्याची बाईक घराबाहेर पार्क केलेली पाहिली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. दुचाकीसोबत माफी-पत्र आणि 1500 रुपयेही ठेवण्यात आले होते. या अनोख्या चोराने चोरीला गेलेली बाईक तर परत केलीच; पण बाईक मालकाची माफीही मागितली आणि त्याला 1500 रुपये भरपाईही दिली.
हेही वाचा - माकडानं दीड लाखांचा मोबाईल फोन पळवला; 'बिरबलाच्या बुद्धीनं केली युक्ती', व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू
चोराने त्याच्या पत्रात लिहिले आहे की, त्याला परवानगीशिवाय बाईक घेऊन जाणे भाग पडले होते. त्याने सांगितले की, तो चौपदरी महामार्गावर अडकला होता आणि काही तातडीच्या कामासाठी त्याला ताबडतोब गाडीची आवश्यकता होती.
चोराने माफी मागितली
चोराने त्याच्या पत्रात लिहिले आहे, तुमच्या बाईकने मला खूप मदत केली. मी तुमचा आभारी आहे. कृपया हे पैसे स्वीकारा आणि मला माफ करा. चोराने असेही म्हटले की, त्याला त्याची चूक मान्य आहे आणि झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल तो माफी मागतो. त्याने भरपाई म्हणून बाईकच्या पेट्रोल टाकीवर 1500 रुपये टाकले.
सोशल मीडियावर आल्या अशा प्रतिक्रिया?
या घटनेने सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतले. सहसा चोर आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करतात; परंतु, येथे चोराने आपली चूक मान्य केली आणि भरपाई दिली. यामुळे लोक आश्चर्यचकित झाले. अनेक नेटिझन्सनी चोराच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले; तर, काहींनी याला 'एक असामान्य पण प्रेरणादायी घटना' म्हटले. पोलिसांनी या प्रकरणात काही कारवाई केली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटने काय समजते?
या कथेतून असे दिसून येते की, कधीकधी लोकांवर परिस्थितीमुळे गुन्हा करण्याची वेळ येते. परंतु, असे लोक अनेकदा त्यांची चूक सुधारण्याचे धाडस देखील दाखवू शकतात. सर्व बाजूंनी कमी-जास्त प्रमाणात गुन्ह्यांच्या आणि वाईट बातम्या ऐकायला मिळत असताना ही घटना आपल्याला मानवता आणि प्रामाणिकपणाची आठवण करून देते. यामुळे असा प्रश्नही उपस्थित होतो की, आपण आपल्या सभोवतालच्या लोकांवर अधिक विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांच्या अडी-अडचणी, मजबुरी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे का?
हेही वाचा - VIDEO: पालकांनो, मुलांना कुत्र्यांपासून दूर ठेवा; चिमुकल्याचा हा व्हिडिओ पाहून पायाखालची जमीन सरकेल!