मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान पाठोपाठ शाहरूख खानलाही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सलमानला बिश्नोई टोळीने धमकी दिल्याचे वृत्त आले होते. या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. हा तपास सुरू असतानाच शाहरूखला धमकी आली आहे. काही दिवसांच्या अंतराने बॉलिवूडच्या दोन अभिनेत्यांना धमक्या आल्या आहेत. यामुळे पोलिसांनी धमकी प्रकरण गांभिर्याने घेतले आहे.