मेष (Aries) : व्यवसायातील कामे वाढत असून रात्री एखादी मोठी डिल फायनल होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती उत्तम आहे, तुम्ही गुंतवणुकिचा विचार नक्की करा.
वृषभ (Taurus) : तुम्ही नोकरीनिमित्त रिलोकशनचा विचार करत आहात त्यावर फायनल निर्णय घेणार आहात. ऑफिसमध्येही वातावरण तुमच्या बाजूने असेल आणि सहकाऱ्यांचा उत्तम पाठिंबा मिळेल.
मिथुन (Gemini) : आजचा दिवस खूपच क्रिएटीव्ह असून तुमच्या आवडीच्या काम करण्याची संधी मिळेल. आवडीचे काम केल्यामुळे मानसिक समाधान वाढेल तसेच मनावरील ताण कमी होईल.
कर्क (Cancer) : अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणार आहात. काही महत्त्वाच्या चर्चा घडतील. ऑफिसमध्ये तुमच्या विचारांप्रमाणे वातावरण तयार होईल आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल.
हेही वाचा : Diwali Laxmi Puja : 'या' गोष्टींशिवाय दिवाळीतील लक्ष्मी पूजा अपूर्ण; जाणून घ्या संपूर्ण साहित्य
सिंह (Leo) : ज्या कामांमध्ये जोखीम आहे ते टाळा, अन्यथा नुकसान होवू शकते. ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला मदत करतील.
कन्या (Virgo) : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे विशेष करून करिअरमध्ये प्रगतीचे योग आहे. राजकीय गोष्टीत सहभाग असेल तर वेळ उत्तम आहे.
तुळ (Libra) : नोकरदारांची प्रगती तसेच ऑफिसमध्ये कौतुक होणार आहे. खूप काम असल्यामुळे थोडा थकवा जाणवेल. तब्येतीची काळजी घ्या. सकारात्मक विचार करा तसेच दुपारनंतर चांगली बातमी मिळणार आहे.
वृश्चिक (Scorpio) : आज पदोन्नतीची शक्यता असून धनलाभाचे योग आहेत. आर्थिक स्थिती उत्तम आहे तेव्हा गुंतवणुकिचा विचार करा. घरातील वातावरण आनंदी असेल.
हेही वाचा : Gold Price Today: दिवाळीच्या दिवशी सोन्याची चमक झाली फिकी, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
धनु (Sagittarius) : या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा आहे. संपत्ती मिळण्याचे योग दिसत आहेत. मान-प्रतिष्ठा वाढणार असून तुम्ही दानधर्म करणार आहात.
मकर (Capricorn) : मुलांशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल. जे काही काम करता त्यात प्रामाणिकपणा आणि नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
कुंभ (Aquarius) : सहकाऱ्यांप्रती आदरभाव ठेवा त्यांना मान सन्मान द्या आणि त्यांच्याशी नीट बोला त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट पटकन मार्गी लागतील.
मीन (Pisces) : मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभाचा आहे. संवाद आणि व्यवहारात संयम आणि काळजी घ्यायला हवी. आजूबाजूच्या लोकांशी संघर्ष होणार नाही याची काळजी घ्या.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)