Monday, March 09, 2026 06:20:41 PM

Jalgaon Viral Video : खेळता खेळता चिमुरड्याचं डोकं अडकलं ॲल्युमिनियमच्या भांड्यात; तासाभराच्या थरारानंतर..., पाहा व्हायरल व्हिडिओ

एका दोन-अडीच वर्षांच्या चिमुरड्याचं डोकं खेळता खेळता घरगुती वापराच्या एका अरुंद ॲल्युमिनियमच्या भांड्यात अडकले.

jalgaon viral video  खेळता खेळता चिमुरड्याचं डोकं अडकलं ॲल्युमिनियमच्या भांड्यात तासाभराच्या थरारानंतर पाहा व्हायरल व्हिडिओ

Child Head Stuck in Aluminum Pot: लहान मुले खेळताना कधी काय करतील याचा नेम नसतो. अशीच एक धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात घडली. येथे एका दोन-अडीच वर्षांच्या चिमुरड्याचं डोकं खेळता खेळता घरगुती वापराच्या एका अरुंद ॲल्युमिनियमच्या भांड्यात अडकले. अनेक प्रयत्नांनंतरही डोकं बाहेर निघत नसल्याने पालकांची मोठी घाबरगुंडी उडाली होती.

खेळताना ओढवला प्रसंग
मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलगा घरातील भांड्यांशी खेळत होता. खेळण्याच्या नादात त्याने ॲल्युमिनियमचं एक भांड डोक्यात घातलं. मात्र, भांड्याचं तोंड अरुंद असल्याने त्याचे डोकं त्यात घट्ट अडकून बसले. पालकांनी तेल आणि साबण लावून डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलगा रडू लागल्याने आणि भांड अधिकच घट्ट बसल्याने परिस्थिती गंभीर बनली.

हेही वाचा - Heart Attack on Badminton Court: बॅडमिंटन खेळताना 57 वर्षीय व्यापाऱ्याचा मृत्यू; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

गॅस कटर किंवा कटरचा वापर करून सुटका
परस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुलाला तातडीने जवळच्या वर्कशॉप किंवा कारागिराकडे नेण्यात आले. तेथे अतिशय सावधगिरीने इलेक्ट्रिक कटरच्या साहाय्याने ॲल्युमिनियमचं ते भांड कापण्यात आलं. यावेळी मुलाला कोणतीही इजा होऊ नये, यासाठी कारागिरांनी आणि ग्रामस्थांनी मोठी खबरदारी घेतली. सुमारे एक ते दीड तासाच्या प्रयत्नांनंतर मुलाचे डोकं डब्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं.

पालकांसाठी धोक्याची घंटा
या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती. मुलाची सुखरूप सुटका झाल्यानंतर पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र, या घटनेने लहान मुलांच्या पालकांसाठी एक मोठा धडा दिला आहे. घरामध्ये खेळताना मुले अशा वस्तूंसोबत खेळत नाहीत ना, ज्या त्यांच्या जीवावर बेतू शकतात, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या