Electric Scooter : वाढत्या पेट्रोलच्या किमतींमुळे सध्या दुचाकी प्रेमींचा कल इलेक्ट्रिक गाड्यांकडे मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. 'एकदा चार्ज केली की किती किलोमीटर धावेल?' हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी भारतीय बाजारपेठेत आता अशा काही इलेक्ट्रिक स्कूटर्स आल्या आहेत, ज्यांची रेंज पाहून तुम्ही थक्क व्हाल. पेट्रोलच्या त्रासातून मुक्त होऊन 'फ्री' प्रवासाचा आनंद देणाऱ्या टॉप-5 इलेक्ट्रिक स्कूटर्सची वैशिष्ट्ये जाणून घेऊ..
1. ओला एस1 प्रो स्पोर्ट (Ola S1 Pro Sport)
इलेक्ट्रिक स्कूटरच्या दुनियेत 'ओला'ने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ओला एस1 प्रो स्पोर्ट (5.2 kWh मॉडेल) ही सध्याची सर्वात जास्त रेंज देणारी स्कूटर मानली जाते.
बॅटरी: 5.2 kWh
रेंज: एकदा फुल चार्ज केल्यावर तब्बल 320 km (IDC).
वेग: ताशी 141 km चा टॉप स्पीड.
किंमत: 1,64,999 रुपये (एक्स-शोरूम).
2. सिंपल वन जनरेशन 2 (Simple One Gen 2)
सिंपल एनर्जीने आपल्या दुसऱ्या जनरेशनच्या मॉडेलसह बाजारात खळबळ उडवून दिली आहे. ज्यांना स्टायलिश लूक आणि जास्त रेंज हवी आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
बॅटरी: 5 kWh
रेंज: सिंगल चार्जमध्ये 265 km.
वेग: ताशी 115 km वेगाने धावण्यास सक्षम.
किंमत: 1,77,999 रुपये (एक्स-शोरूम).
3. टीव्हीएस आयक्यूब एसटी (TVS iQube ST)
विश्वासार्हता आणि दमदार परफॉर्मन्ससाठी टीव्हीएस आयक्यूब प्रसिद्ध आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही एक सोयीस्कर आणि सुरक्षित फॅमिली स्कूटर आहे.
बॅटरी: 5.3 kWh
रेंज: पूर्ण चार्जवर 212 km पर्यंतचा प्रवास.
वेग: ताशी 82 km चा टॉप स्पीड.
किंमत: 1,62,704 रुपये (एक्स-शोरूम).
हेही वाचा - Affordable Diesel Cars: फॅमिलीसाठी या डिझेल SUV एकदम परफेक्ट! फीचर्स आणि मायलेजमध्ये कोण आहे भारी?
4. रिवर इंडी (River Indie)
'एसयूव्ही ऑफ स्कूटर्स' म्हणून ओळखली जाणारी रिवर इंडी ही तिच्या मजबुतीसाठी आणि मोठ्या स्टोअरेज स्पेससाठी ओळखली जाते.
बॅटरी: 4 kWh
रेंज: एकदा चार्ज केल्यावर 163 km.
वेग: ताशी 90 km चा टॉप स्पीड.
किंमत: 1,42,999 रुपये (एक्स-शोरूम).
5. प्युअर ईव्ही ईप्लूटो 7जी मॅक्स (Pure EV EPluto 7G Max)
क्लासिक लूक आणि बजेटमध्ये बसणारी ही स्कूटर भारतीय बाजारपेठेत चांगली कामगिरी करत आहे. कमी खर्चात जास्त किलोमीटर धावण्यासाठी ही उत्तम आहे.
बॅटरी: 3.5 kWh
रेंज: कंपनीचा दावा 150 km ते 211 km पर्यंत.
वेग: ताशी 72 km चा टॉप स्पीड.
किंमत: 1,17,699 रुपये (एक्स-शोरूम).
हेही वाचा - Starlink Smartphone Update: स्टारलिंकचे मोबाईल फोन लाँच होणार? इलॉन मस्क यांनी अफवांना पूर्णविराम देत स्पष्टच सांगितले, म्हणाले...