मुंबई : टोरेस प्रकरणातल्या आरोपींच्या पोलीस कोठडीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मीरा रोड कार्यालयातून आरोपींना अटक झाली होती.
टॉरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील 3 आरोपींना 6 जानेवारीला मुंबई सत्र न्यायालयात सादर करण्यात आलं होतं. या सुनावणी दरम्यान तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही पोलीस कोठडी आज संपत असून आज पुन्हा या तिन्ही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
तौफिक रियाजनं फसवणूक केल्याचा टोरेसचा दावा
तौफिक रियाजनं फसवणूक केल्याचा टोरेसचा दावा आहे. टोरेसच्या इन्स्टा अकाऊंटवर नवा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. या व्हिडिओमधून गुंतवणूकदारांना फसवणाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. टोरेस कार्यालयात काम करणाऱ्या 49 लोकांची नाव जाहीर झाली. टोरेस प्रकरणातील घोटाळ्यानंतर वारंवार टोरेस इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करणे सुरूच आहे. काल पुन्हा नवीन व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे आणि या व्हिडिओमधून गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या लोकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. टोरेस दुकानात लूटमार झाली असून ती लूटमार आणि दुकान तौफिक रियाज याने प्लॅन करून लुटले असल्याचे सांगितले आहे. या टोरेस दुकानात काम करणाऱ्या ऐकून 49 लोकांची नाव देण्यात आली आहेत आणि पुन्हा टोरेस कंपनीकडून नागरिकांना पैसे देणार असल्याचे आमिष देण्यात येत आहेत.
हेही वाचा : HSC Students: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
टोरेसचा मुख्य संचालक फरार
टोरेसच्या कार्यालयावर पोलिसांची छापेमारी सुरुच आहे. टोरेस अंधेरीच्या सिप्झमधून मोझोनाईट हिरे घेत असल्याची पोलिसांकडे माहिती मिळाली आहे. इमिटेशन दागिन्यांमध्ये वापरण्यात येणारे खोटे हिरे ग्राहकांना विकल्याची माहिती समोर येत आहे. ख्रिसमसच्या सुट्टीचे निमित्त सांगून टोरेसचे मुख्य संचालक फरार झाले असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आले.
टोरेस घोटाळा प्रकरणात पोलिसांकडून 3 दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. 2 दिवसांपूर्वीच्या छापेमारीत दागिणे आणि 5 कोटींची रक्कम हस्तगत करण्यात आली. टोरेस अंधेरी सिप्झमधून मोझोनाईट हिरे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. टोरेसने 300 रू चे मोझोनाईट हिरे हजारो रुपयांना विकल्याची माहिती आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सिप्झमधील दोन्ही पुरवठादारांना समन्स बजावला आहे. ख्रिसमसच्या सुट्टीचे निमित्त सांगून टोरेसचे मुख्य संचालक फरार आहेत. विक्टोरिया कोवालेकोसह अन्य काही पदाधिकारी देशाबाहेर फरार असल्याची बाब आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आली.