मुंबई : महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी नऊ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. यात पाच कोटी २२ हजार ७३९ पुरुष मतदार आणि चार कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार तसेच सहा हजार १०१ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली.
राज्यात सर्वात जास्त मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात ८८ लाख ४९ हजार ५९० इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४५ लाख ७९ हजार २१६ पुरुष मतदार, ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार तर ८०५ इतक्या तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात सर्वात कमी मतदारांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ३ लाख ३६ हजार ९९१ पुरुष मतदार, ३ लाख ४१ हजार ९३४ महिला मतदार तर ३ इतक्या तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे. या व्यतिरिक्त राज्यात सेवादलातील (सर्व्हिस व्होटर) १ लाख १६ हजार १७० मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये १ लाख १२ हजार ३१८ पुरुष मतदार तर ३ हजार ८५२ महिला मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात वयाची शंभरी पार केलेल्या ४७ हजार ३८९ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरुष मतदार २१ हजार ८९, महिला मतदार २६ हजार २९८ तर २ इतक्या तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे.