२७ सप्टेंबर, २०२४, हैदराबाद : सिंधुदुर्गमध्ये पर्यटक म्हणून आलेल्या ६ तरुणांकडून स्थानिक युवतीची छेडछडा काढत विनयभंग करुन दिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परजिल्ह्यातील ६ तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संशयीत ६ तरुणांमध्ये ४ जण पोलीस कर्मचारी असल्याची माहिती आहे. देवगडमध्ये घडलेल्या या घटनेनंतर रात्री उशीरा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपींना देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना शनिवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींमध्ये हरिनाम गिते, माधव सुगराव केंद्रे, श्याम बालाजी गिते, शंकर संभाजी गिते, प्रवीण विलास रानडे, शंकर संभाजी गिते यांचा समावेश आहे.