मुंबई : मुंबई - अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस स्वातंत्र्यदिनापासून सुरू होणार. ही गाडी सुरू झाल्यावर पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई - अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या इतर गाड्यांच्या तुलनेत कमी वेळात प्रवास पूर्ण करता येईल. रेल्वे प्रशासनाने १५ ऑगस्टपासून वंदे भारत, शताब्दी, आयआरसीटीसी तेजस, डबल डेकर आणि दिल्ली-मुंबई राजधानी या गाड्या ताशी १६० किमी वेगाने पळवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवास वेगाने होईल आणि वेळेची बचत होईल. वंदे भारत एक्सप्रेसमुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास चार तास चाळीस मिनिटांत पूर्ण होईल. शताब्दी एक्सप्रेसमुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास चार तास पन्नास मिनिटात पूर्ण होईल. आयआरसीटीसी तेजस एक्सप्रेसमुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास पाच तास पन्नास मिनिटांत पूर्ण होईल. डबल डेकरमुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास सव्वासहा तासांत पूर्ण होईल. राजधानी एक्सप्रेसमुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास बारा तासांत पूर्ण होईल.