Sunday, November 10, 2024 07:50:04 AM

Maharashtra
महाराष्ट्राला केंद्राकडून कर हस्तांतरण

महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ११ हजार २५५ कोटी रुपये कर हस्तांतरण करण्यात आले.

महाराष्ट्राला केंद्राकडून कर हस्तांतरण

मुंबई : महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ११ हजार २५५ कोटी रुपये कर हस्तांतरण करण्यात आले. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवली खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्‍कमेचाही समावेश आहे. उर्वरित निधी हा राज्याच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना एक लाख ७८ हजार १७३ कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ऑक्टोबर २०२४ मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त ८९ हजार ८६ कोटी ५० लाख रुपयांच्या एका अग्रीम हप्त्याचा समावेश आहे. या हस्तांतरणाचा उद्देश आगामी सणासुदीच्या काळात राज्यांना भांडवली खर्चात मदत करणे आणि त्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्याचा आहे.

महाराष्ट्राला या हस्तांतरणातून ११ हजार २५५ कोटी रुपये मिळाले आहेत. हा निधी राज्याच्या महत्त्वाच्या योजना आणि उपक्रमांसाठी सहाय्यभूत ठरणार आहे. हे आर्थिक हस्तांतरण राज्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल, ज्यामुळे भांडवली खर्च आणि लोककल्याणाच्या दृष्टीने राज्यांच्या विकासाला गती मिळेल.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo