छत्रपती संभाजीनगर : पंजाबमध्ये लवकरच लग्न होणार असलेल्या तरुणीची आणि इतर दोघांची हत्या करण्यात आली. या तिहेरी हत्याकांडाच्या आरोपींना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. समृद्धी महामार्गावर सापळा रचून पोलिसांनी आरोपींना अटक केलं.
हत्या करुन पळालेले आरोपी नांदेडमध्ये आहेत. समृद्धी महामार्गावरुन आरोपी मुंबईच्या दिशेने पलायन करणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचला. सशस्त्र आरोपींना धाडसी कारवाई करुन पोलिसांनी पकडले. पंजाब पोलीस आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलीस पथक यांनी संयुक्त कारवाई केली. पोलिसांनी सात जणांना अटक केली.