Tuesday, November 18, 2025 10:12:08 PM

Tulsi Vivah 2025 : विवाह लवकर जुळण्यासाठी तुळशी विवाहादिवशी करा 'हे' सोपे उपाय; वैवाहिक जीवनातील अडचणीही होतील दूर!

तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या रोपाखाली शुद्ध देशी तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवा लावताना आपली मनोकामना मांडावी.

tulsi vivah 2025  विवाह लवकर जुळण्यासाठी तुळशी विवाहादिवशी करा हे सोपे उपाय वैवाहिक जीवनातील अडचणीही होतील दूर

Tulsi Vivah 2025 : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा सण अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला हा विवाह सोहळा साजरा केला जातो. यावर्षी 2 नोव्हेंबर रोजी हा सण येत आहे. याच दिवशी माता तुळशीचा विवाह भगवान शाळिग्राम (भगवान विष्णूंचे स्वरूप) यांच्याशी लावला जातो.

तुळशी विवाहामागील पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, वृंदा नावाची एक पवित्र स्त्री होती. ती असुरराज जालंधरची पत्नी होती. धर्माच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी जालंधराचा वध केला. तेव्हा वृंदाने विष्णूंना शाप दिला की, ते शाळिग्राम दगडाच्या रूपात पूजले जातील. नंतर वृंदाचा तुळशीच्या रूपात पुनर्जन्म झाला. आपल्या भक्तीच्या बळावर तिने विष्णूंना पती म्हणून प्राप्त केले. तेव्हापासून, दरवर्षी प्रबोधिनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळस आणि शाळिग्राम यांचा विवाह करण्याची परंपरा सुरू झाली.

विवाह विधी आणि विशेष उपाय
तुळशी विवाहाच्या दिवशी लोक आपल्या अंगणात मंडप सजवतात. तुळशीच्या रोपाला नवरीसारखे (वधू) सजवले जाते, तिला चुनरी, बिंदी, हार आणि बांगड्या अर्पण केले जातात. तर भगवान शालिग्राम यांना वर रूपात सजवले जाते. मंत्रोच्चारणासह हा विवाह विधी संपन्न केला जातो आणि त्यानंतर प्रसाद वाटला जातो.
मान्यतेनुसार, तुळशी विवाहाच्या दिवशी काही सोपे उपाय केल्यास विवाहाशी संबंधित सर्व अडचणी दूर होतात आणि मनोरथ पूर्ण करणारे विवाहयोग जुळून येतात.

हळदीचा पवित्र उपाय
ज्यांच्या विवाहात अडचणी येत आहेत किंवा विलंब होत आहे, त्यांनी सकाळी अंघोळीपूर्वी आपल्या स्नानाच्या पाण्यात एक चिमूटभर हळद मिसळावी. यामुळे शरीर आणि मन शुद्ध होते, तसेच गुरू ग्रह (बृहस्पती) बळकट होतो.
स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून तुळशी माता आणि शाळिग्राम यांची पूजा करावी. पूजनाच्या वेळी तुळस आणि शाळिग्राम यांना हळदीचा लेप किंवा हळद मिश्रित दूध अर्पण करावे. यामुळे कुंडलीतील गुरूची स्थिती मजबूत होते आणि विवाहाचे योग प्रभावी बनतात.

हेही वाचा - मंगल कार्यांना होणार सुरुवात! जाणून घेऊ कधी आहे तुळशी विवाह, प्रबोधिनी एकादशी, त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्यांचे महत्त्व

पवित्र 'विवाहसंस्कार' आणि दान
तुळशी विवाह सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुळस आणि शाळिग्राम यांचे गठबंधन (विवाह-संस्कार). पूजनानंतर तुळशीचे रोप आणि शाळिग्राम यांना मौली (लाल पवित्र धागा) ने बांधून गठबंधन करावे. हे दैवी मिलन आणि वैवाहिक बंधनाचे प्रतीक आहे.
गठबंधन झाल्यावर लगेचच गरिबांना, ब्राह्मणाला किंवा कन्यांना कपडे, फळे, मिठाई किंवा धनदान अवश्य करावे. या दानाचे फळ अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

तुळशीजवळ दिवा लावा आणि मंत्र-जप करा
तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या रोपाखाली शुद्ध देशी तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवा लावताना आपली मनोकामना मांडावी.
यानंतर तुळशी चालीसा चा पाठ करावा आणि "ऊं सृष्टिकर्ता मम विवाह कुरु कुरु स्वाहा" या वैदिक मंत्राचा 11 किंवा 108 वेळा जप करावा. हा उपाय केल्याने तुळशी माता लवकर प्रसन्न होतात. घरात सुख, शांती आणि सौभाग्य येते, तसेच विवाह विलंबाच्या सर्व बाधा दूर होऊ लागतात.

हेही वाचा - Tulsi Upaay: संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने हे 5 फायदे मिळतील


सम्बन्धित सामग्री