Tulsi Remedies : सनातन धर्मात तुळशीचे रोप पूजनीय मानले जाते. तुळशीचे रोप केवळ तुमचे नशीब उजळवतेच; शिवाय, वास्तुतील म्हणजे घरातील वातावरण सुधारते. तुळशीला भगवान विष्णूंची प्रिय मानली जाते. तुळशीची माळ नेहमीच त्यांच्या गळ्यात राहते. जो व्यक्ती दररोज तुळशीचे सेवन करतो, तो निरोगी तर राहतोच; शिवाय, त्याची नरकातून मुक्तता देखील होते. तंत्रशास्त्रानुसार, तुळशीचे काही उपाय केल्याने नशीबही चमकू शकते. यामुळे घरात सुख-शांती येते आणि शुभ गोष्टीही मिळतात. चला जाणून घेऊया, या तुळशीच्या उपायांबद्दल..
धनाची कमतरता भासणार नाही
तंत्रशास्त्रानुसार, तुळशीचा संबंध मंगळाशी आहे. म्हणून, तुमच्या पर्समध्ये किंवा कपाटात तुळशीचे पान ठेवा. त्यामुळे तुमच्या घरात धनाची कमतरता कधीच भासणार नाही. तुम्हाला पुरेशी संपत्ती-पैसा मिळत राहील. तसेच, जिथे तुम्ही पैशाचा हिशोब लिहिता तिथे तुळशीचे पान ठेवा. असे केल्याने, तुम्हाला कधीही धन आणि धान्याची उणीव भासणार नाही.
हेही वाचा - Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेत रथाची दोरी ओढणे खूपच शुभ का मानले जाते?
व्यवसायात यश मिळेल
जर मंदीच्या काळात व्यवसाय चांगला चालत नसेल तर, तुळशीची पाने तीन दिवस पाण्यात ठेवा. नंतर कारखाना किंवा कामाचे ठिकाण किंवा दुकानाच्या दारावर हे पाणी शिंपडा. असे केल्याने व्यवसायातील मंदी दूर होईल. तसेच, ही ऊर्जा चोरांना किंवा आतल्या शत्रूंना दूर ठेवते. तसेच, मनातील नकारात्मकता आणि इतर स्वभावदोषांवरही मात करण्यासाठी याचा उपयोग होतो. तुळस आणि ती धारण करणाऱ्या भगवान विष्णूविषयी मनात पवित्र भक्तिभाव ठेवल्यास नशिबातल्या कमतरतांवरही मात केली जाते.
घरात आर्थिक समृद्धी वाढेल
शनिवारी गव्हात 100 ग्रॅम काळे हरभरे, 11 तुळशीची पाने आणि दोन काड्या केशर मिसळून दळण्यासाठी द्या. असे केल्याने आर्थिक समृद्धी वाढेल, त्याचबरोबर कुटुंबात सुख-शांती राहील. तसेच सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
मंदीतही नोकरीत पदोन्नती मिळेल
जर तुम्हाला मंदीमुळे नोकरी जाण्याची भीती वाटत असेल किंवा पदोन्नती मिळत नसेल तर गुरुवारी तुळशीचे रोप पिवळ्या कपड्यात बांधून तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवा. तसेच, सोमवारी सकाळी 16 तुळशीच्या बिया पांढऱ्या कपड्यात गुंडाळा आणि ऑफिसच्या मातीत पुरून टाका. असे केल्याने नोकरी जाण्याची भीती दूर होईल आणि तुम्हाला पदोन्नती देखील मिळू शकते.
हेही वाचा - जगन्नाथ मंदिराच्या 'या' पायरीवर कधीच पाय ठेवत नाहीत.. अशी आहे यमराजाशी जोडलेली अद्भुत कथा
कुटुंबात शांती आणि आनंद राहील
कुटुंबात शांती आणि सदस्यांमध्ये प्रेम टिकवून ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात काही तुळशीची पाने ठेवा. असे केल्याने घरात शांती आणि आनंद तर राहतोच, पण आरोग्यही चांगले राहते. तसेच, दररोज तुमच्या आंघोळीच्या पाण्यात तुळशीची पाने मिसळा आणि आंघोळ करा. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहील.
वाईट आत्मा किंवा बाधा दूर करण्यासाठी उपाय
जर मुलाला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला वाईट आत्मा किंवा वाईट नजरेने त्रास होत असेल तर, 'ओम नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र म्हणण्यास सांगा आणि तुम्ही स्वतःही त्या व्यक्तीसाठी म्हणत रहा. तसेच, या व्यक्तीला दररोज नियमाने तुळशीची काही पाने खाण्यास द्या. सदर व्यक्तीच्या डोक्याशी रात्री झोपताना एका वाटीत किंवा कापडात बांधून तुळशीची काही पाने आणि देवासमोरचा उदी-अंगारा किंवा मंदिरातून आणलेली उदी ठेवावी. तसेच, त्या व्यक्तीच्या कपाळालाही ही उदी लावावी. यामुळे बाधा दूर होईल.
(Disclaimer : ही बातमी धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याची हमी देत नाही.)