Friday, December 05, 2025 02:15:24 AM

Onkar Elephant Video : धक्कादायक ! ओंकार हत्तीला मारहाण केल्यानंतर आता त्याच्यावर फेकले फटाके, व्हिडीओ पाहून तुमचाही होईल संताप

एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नदीत शांतपणे अंघोळ करत असताना त्याच्यावर फटाके टाकण्यात आले.

onkar elephant video  धक्कादायक  ओंकार हत्तीला मारहाण केल्यानंतर आता त्याच्यावर फेकले फटाके व्हिडीओ पाहून तुमचाही होईल संताप

सिंधुदुर्ग येथील ओंकार हत्तीबद्दलची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी ओंकार हत्तीला मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता त्याच्याबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नदीत शांतपणे अंघोळ करत असताना त्याच्यावर फटाके टाकण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, ओंकार हत्ती तुळसाण येथील नदीत आंघोळ करत होता. त्याचवेळी काही व्यक्तींनी त्याच्या शेजारी पाण्यात सुतळी बॉम्ब फेकले. या फटाक्यांच्या आवाजामुळे ओंकार हत्ती भेदरला आणि पाण्यात आत जाऊ लागला. दरम्याने या घटनेने प्राणीप्रेमी संतापले आहेत. 

हेही वाचा - Amitabh Bachchan: मुंबईत बिग बींची करोडोंची रिअल इस्टेट डील! दोन आलिशान फ्लॅट्स विक्रीतून मिळाला भन्नाट नफा; किती कोटींचा फायदा झाला? 

फटाके फेकून हत्तीला इजा झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल प्राणीप्रेमींनी वनविभागासमोर उपस्थित केला आहे. दोन दिवसांपूर्वी ओंकार हत्तीला दांड्याने मारहाण केली होती, त्यानंतर आता सुतळी बॉम्ब फेकले आहेत. त्याच्या अंगावर फटाके फेकण्याचा प्रकार झाल्यामुळे असाच प्रकार सुरू झाल्यास तो चिडल्यास त्याच्याकडून मनुष्य आणि किंवा जीवितहानी होऊ शकते, अशी शक्यताही प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा - Mohammed Shami : मोहम्मद शमीच्या बायकोने केली अधिक पोटगीची मागणी, न्यायालयाने फटकारलं, म्हणाले, 'चार लाख कमी आहेत...?' 

हत्तींच्या संरक्षणासाठी कायदा 
हत्तींच्या संरक्षणासाठी WLPA च्या कलम 43 नुसार हत्ती हा अनुसूची 1 चा प्राणी आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 आणि हत्ती संरक्षण कायदा, 1879. वन्यजीव (संरक्षण) नुसार त्यांची शिकार करण्यास सक्त मनाई आहे. हत्ती संरक्षण कायदा, 1879 च्या कलम 9 मध्ये वन्य हत्तींना मारण्यास, जखमी करण्यास मनाई करणारी तरतूद आहे. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 मध्ये प्राण्यांना अनावश्यक त्रास देणे हा गुन्हा मानला जातो.
 


सम्बन्धित सामग्री