पालघर : सरकार पालघर जिल्ह्यात दोन मोठ्या बंदरांची उभारणी करत आहे. वाढवण बंदरापाठोपाठ राज्य शासनाकडून पालघर जिल्ह्यातील मुरबे बंदराच्या उभारणीलाही मंजुरी मिळाली आहे. मुरबे बंदरासाठी चार हजार २५९ कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मुरबे हे बारमाही बंदर असेल. या बंदरातून मालवाहतूक हाताळली जाईल.
समुद्रात खडकाळ भागावर मुरबे बंदर उभारले जाणार आहे. मुरबे हा बहुउद्देशीय बंदर प्रकल्प उभारण्यासाठी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर या विकासकाच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली. याबाबत तांत्रिक अभ्यास, मच्छिमारांच्या पुनर्वसनाचा अभ्यास सीडब्लूपीआरएस, सीएमएफआरआय या तज्ज्ञ संस्थांकडून करुन घेतला जाईल.