छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चालत्या एसटी बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गुरुवारी सिल्लोड आगाराची बस हट्टी येथे जात असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चांदापूर गावालगत दोन ज्येष्ठ नागरिकांमध्ये हाणामारी झाली. एका नागरिकाचे वय ७५ होते तर दुसऱ्याचे वय ६० पेक्षा कमी होते. या ज्येष्ठ नागरिकांमध्ये बुटाने विशेष म्हणजे चालकाच्या बाजूला असलेल्या बोनटवर एक जण बसलेला होता. त्यांच्या हाणामारीमुळे चालकाचे बसवरील लक्ष विचलित होऊ लागल्याने चालक इब्राहिम पठाण यांनी बस अवघड वळण रस्त्यावर थांबवून त्यांचे भांडण सोडविले. केवळ धक्का लागल्यामुळे झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.
https://youtu.be/QjGx0CQrfTQ?si=Tv8br7EZ6pQgsAbC