Tuesday, March 17, 2026 03:15:41 PM

Nail Shapes : तुमच्या हातांना द्या परफेक्ट लूक! जाणून घ्या नखांचे ट्रेंडी आकार

नखे सुंदर आणि मजबूत असावी असं सर्वांनाच वाटते. सुंदर आणि आकर्षक नखे व्यक्तिमत्त्वाला वेगळी ओळख देतात. योग्य काळजी घेतली तर नखे अधिक आकर्षक आणि मजबूत राहू शकतात.

nail shapes  तुमच्या हातांना द्या परफेक्ट लूक जाणून घ्या नखांचे ट्रेंडी आकार


नखे सुंदर आणि मजबूत असावी असं सर्वांनाच वाटते. सुंदर आणि आकर्षक नखे व्यक्तिमत्त्वाला वेगळी ओळख देतात. योग्य काळजी घेतली तर नखे अधिक आकर्षक आणि मजबूत राहू शकतात. योग्य नखांचा आकार निवडल्यास हातांची शोभा अधिक खुलते. सध्या विविध नेल शेप्स ट्रेंडमध्ये असून प्रत्येक आकाराची खास वैशिष्ट्ये आहेत. चला तर जाणून घेऊया नखांचे लोकप्रिय आकार आणि त्यांची सविस्तर माहिती

गोल आकार (Round Shape)
गोल आकाराची नखे नैसर्गिक दिसतात आणि सांभाळायला सोपी असतात. छोट्या नखांसाठी हा उत्तम पर्याय आहे. ऑफिस, नखांचा हा आकार घरकाम किंवा रोजच्या वापरासाठी सुरक्षित आणि टिकाऊ मानला जातो.

चौकोनी आकार (Square Shape)
चौकोनी नखांमध्ये सरळ कडा आणि सपाट टोक असते. हा आकार बोल्ड लूक देतो आणि फ्रेंच मॅनिक्युअरसाठी लोकप्रिय आहे. मध्यम ते लांब नखांवर हा आकार अधिक आकर्षक दिसतो.

स्क्वोव्हल (Squoval Shape)
स्क्वोव्हल हा चौकोनी आणि गोल आकाराचा मिश्र प्रकार आहे. कडा थोड्या गोल केल्यामुळे नखे कमी तुटतात. साधेपणा आणि स्टाईल यांचा संतुलित पर्याय म्हणून हा आकार अनेकांना आवडतो.

ओव्हल आकार (Oval Shape)
ओव्हल नखे बोटांना लांब आणि सडपातळ दिसण्यास मदत करतात. हा आकार एलिगंट लूक देतो. अशी नखं मध्यम ते लांब नखांवर अधिक उठून दिसतात आणि पार्टी किंवा खास प्रसंगांसाठी योग्य ठरतात.

अल्मंड आकार (Almond Shape)
अल्मंड आकार बदामासारखा टोकदार असतो. नखांच्या या आकारामुळे बोटं आकर्षक आणि लांब दिसतात. हा आकार स्टायलिश लूकसाठी लोकप्रिय आहे.

स्टिलेटो आकार (Stiletto Shape)
स्टिलेटो नखे खूप टोकदार आणि धाडसी लूक देतात. फॅशन आणि ग्लॅमरमध्ये हा आकार ट्रेंडमध्ये असतो. मात्र, दैनंदिन कामांसाठी थोडा असुविधाजनक ठरू शकतो आणि तुटण्याची शक्यता जास्त असते.

कॉफिन / बॅलेरिना आकार (Coffin/Ballerina Shape)
हा आकार लांब असून टोक सपाट असते. नखांचा हा आकार बॅलेरिना शूजसारखा दिसतो म्हणून हे नाव पडले.  हा आकार आधुनिक आणि ट्रेंडी लूकसाठी लोकप्रिय, विशेषतः जेल किंवा अॅक्रेलिक नखांसाठी वापरला जातो.

लिपस्टिक आकार (Lipstick Shape)
लिपस्टिक आकारात नखाचे टोक एका बाजूने तिरके कापलेले असते. नखांचा हा आकार अनोखा आणि हटके लूक देतो. 


सम्बन्धित सामग्री