नागपूर : नागपूर येथे शिउबाठाची सभा होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषण केले. या सभेत बोलताना रामटेक हा आपला बालेकिल्ला आहे. मशालीने आता अंधार दूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मालवण येथील पुतळा प्रकरणी बोलताना ते म्हणाले मालवणमधील घटना देशासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. शिवरायांचा पुतळा उभारतानाही स्टील वापरण्याऐवजी लोखंड वापरलं तुम्ही पैसे खाल्लेत असं म्हणत त्यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाहांनी बंद दाराआडचे धंदे सोडावे. हिंमत असेल तर समोर या आवाहन असे त्यांनी अमित शाहांना केले आहे.