लातूर : प्रचारसभेसाठी औसा येथे जात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली. याआधी सोमवारी वणी येथे विमानतळावर उतरताच उद्धव यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली होती. प्रचार काळात दोन दिवसांत दोन वेळा बॅगेची तपासणी झाल्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मोदी - शाहांच्या बॅगा तपासा, अशी मागणी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी सुरू केली आहे. याआधी उद्धव ठाकरेंनी सोमवारी सभेत बोलताना मोदी - शाहा - शिंदे यांच्या बॅगा तपासा अशा स्वरुपाची मागणी केली. तर शिंदेंच्या उमेदवारांकडे आधीच २५ - २५ कोटी रुपये पोहोचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.