वणी : वणी येथे प्रचारसभा घेण्यासाठी जात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सामनाची बॅग सरकारी अधिकाऱ्यांनी तपासली. उद्धव ठाकरेंसोबत ठाकरे सेनेचे विधान परिषदेतील आमदार मिलिंद नार्वेकर होते. नार्वेकरांचीही बॅग तपासण्यात आली. वणीच्या हेलिपॅडवर झालेल्या या तपासणीमुळे उद्धव ठाकरे भडकले. उद्धव ठाकरेंनी त्यांचा संताप वणीच्या प्रचारसभेत बोलून जाहीर केला. पंतप्रधान मोदींची बॅग तपासता का ? एकनाथ शिंदेंची बॅग कधी तपासता का ? असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी सभेतील भाषणातून उपस्थित केले.
याआधी लोकसभेच्या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री त्यांच्या उमेदवारांसाठी रोख रकमा घेऊन हवाई प्रवास करत असल्याचा आरोप ठाकरे सेनेकडून करण्यात आला होता. पण मुख्यमंत्री शिंदेंच्या सामानाची तपासणी केल्यावर आरोपात तथ्य आढळले नाही. विशेष म्हणजे या तपासणीने मुख्यमंत्री बिलकूल नाराज झाले नव्हते. त्यांनी अधिकारी त्यांचे काम करत आहेत अशी प्रतिक्रिया दिली होती.