मुंबई : महाविकास आघाडीच्या एका प्रचार सभेच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत आणि धोरणाबाबत विपर्यास असलेले वक्तव्य केले गेले. विशेष म्हणजे हे वक्तव्य होत असताना उद्धव ठाकरे व्यासपीठावर हजर होते.
पहा काय आहे हे वक्तव्य
शिवरायांच्या कर्तृत्वाबाबत आणि ध्येयधोरणाबाबत दिशाभूल करणारी वक्तव्य सातत्याने केली जात असताना त्यात महा विकास आघाडीच्या प्रचार सभेत झालेल्या वक्तव्याने भर पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक किल्ल्यावर मशिद बांधली जाणे अपेक्षित होते असा थेट दावा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला जातोय.
दरम्यान या वक्तव्याचा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. समाज माध्यमावर भूमिका व्यक्त करताना महाराष्ट्र भाजपाने म्हटलं आहे की, "सावध व्हा... शिवाजी महाराजांचे गडकिल्ले वक्फ बोर्डाच्या तावडीत देण्याचा महविनाश आघाडीचा डाव हाणून पाडा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला महाराष्ट्राची जनता तुमच्या तुष्टिकरणाचा अड्डा बनू देणार नाही... इतिहासाची मोडतोड करणे ही काँग्रेसची जुनी खोड, मतांसाठी विशिष्ट समाजाचं लांगुलचालन करणं हा महाविकास आघाडीचा अजेंडा आहे.
जनाब उध्दव ठाकरे सत्तेसाठी एवढे लाचार झाले आहेत की, त्यांनी देखील याला मूकसंमती दर्शवली." यासोबतच महाराष्ट्र भाजपाने जनतेला आवाहन केलं आहे की, "लक्षात ठेवा... २० नोव्हेंबर रोजी मतदानाला बाहेर पडूया, महाराष्ट्रद्रोही महविनाश आघाडीला दणका देऊया."