Friday, November 14, 2025 07:43:50 PM

हत्येच्या घटनेने अमरावती हादरली

अमरावती शहरात अज्ञात व्यक्तीची निर्घृण हत्या झाली. मृत व्यक्तीचं डोकं आणि धड एकमेकांपासून वेगळं करण्यात आलं आहे.

हत्येच्या घटनेने अमरावती हादरली

अमरावती : राज्यातील अमरावती शहरात अज्ञात व्यक्तीची निर्घृण हत्या झाली. मृत व्यक्तीचं डोकं आणि धड एकमेकांपासून वेगळं करण्यात आलं आहे. मृताचं डोकं गायब आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. फॉरेन्सिक लॅबचे पथक तसेच श्वान पथक बोलावण्यात आले आहे. मृत व्यक्तीचं डोकं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृत व्यक्ती कोण आहे हे समजल्यास हत्येचे कारण आणि मारेकरी यांचा शोध घेण्यास मदत होईल या आशेतून तपास सुरू आहे. डीसीपी गणेश शिंदेंच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 


सम्बन्धित सामग्री