मुंबई : मध्य रेल्वेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-सीएसएमटीदरम्यान चार विशेष रेल्वेगाड्या आणि कलबुर्गी-सीएसएमटी दरम्यान एक विशेष रेल्वेगाडी धावणार आहे.
4 डिसेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यान नागपूर-सीएसएमटी अनारक्षित विशेष रेल्वेगाडीची एक फेरी धावणार आहे. विशेष गाडी क्रमांक 01262 नागपूर येथून 4 डिसेंबर रोजी रात्री 11.55 वाजता सुटणार आहे आणि 5 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता विशेष गाडी क्रमांक 01264 नागपूर येथून सुटणार आहे. नागपूर येथून विशेष गाडी क्रमांक 01266 नागपूर येथून 5 डिसेंबर रोजी दुपारी 3.50 वाजता सुटणार आहे. नागपूर येथून 5 डिसेंबर रोजी दुपारी 3.50 वाजता विशेष गाडी क्रमांक 01264 सुटणार आहे.
विशेष गाड्यांचे वेळापत्रक
4 ते 7 डिसेंबरपर्यंत दररोज नागपूर-सीएसएमटी अनारक्षित विशेष रेल्वेगाडीची एक फेरी धावेल.
विशेष गाडी क्रमांक 01262 नागपूर येथून 4 डिसेंबर रोजी रात्री 11.55 वाजता सुटणार
विशेष गाडी क्रमांक 01264 नागपूर येथून 5 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुटणार
विशेष गाडी क्रमांक 01266 नागपूर येथून 5 डिसेंबर रोजी दुपारी 3.50 वाजता सुटणार
विशेष गाडी क्रमांक 02040 नागपूर येथून 7 डिसेंबर रोजी दुपारी 1.20 वाजता सुटणार
विशेष गाडी क्रमांक 01245 कलबुर्गी येथून 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुटणार