UPI Transaction : भारतामध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने पुन्हा एकदा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे! शहरांपासून ते अगदी ग्रामीण भागांपर्यंत UPI चा वापर इतका वाढला आहे की, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे संचालित UPI ने आतापर्यंतचा सर्वात मोठा मासिक (Monthly) आणि दैनिक (Daily) व्यवहाराचा विक्रम (Transaction Record) गाठला आहे. याचाच अर्थ लोक आता रोजच्या जीवनात रोख (Cash) पैशांचा वापर टाळून डिजिटल पेमेंटला अधिक पसंती देत आहेत.
ऑक्टोबर महिन्यात विक्रमी व्यवहारांची नोंद
ऑक्टोबर महिन्यात UPI च्या माध्यमातून तब्बल 20.70 अब्ज (Billion) रेकॉर्ड ट्रान्जॅक्शन्स (Record Transactions) करण्यात आले. यापूर्वी सप्टेंबरमध्ये 19.63 अब्ज आणि ऑगस्टमध्ये 20.01 अब्ज व्यवहार झाले होते. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, नागरिक रोजच्या जीवनात UPI चा वापर किती झपाट्याने करत आहेत.
एकूण मूल्य (Total Value): NPCI च्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये UPI द्वारे एकूण 27.28 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. सप्टेंबरमध्ये हे मूल्य 24.90 लाख कोटी आणि ऑगस्टमध्ये 24.85 लाख कोटी रुपये होते.
वाढ: गेल्या एका वर्षाच्या तुलनेत UPI व्यवहारांचे प्रमाण 25 टक्क्यांनी वाढले आहे, तर एकूण मूल्यातही 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हेही वाचा - New Financial Rules : आजपासून बदलले नियम; एलपीजी, बँक, जीएसटी आणि पेन्शनर्सवर थेट परिणाम
एका दिवसात सर्वाधिक व्यवहार
18 ऑक्टोबर रोजी UPI च्या माध्यमातून 754.37 दशलक्ष (Million) व्यवहारांची विक्रमी नोंद झाली. UPI सुरू झाल्यापासून एका दिवसात झालेला हा सर्वात मोठा व्यवहार आहे. ऑक्टोबर महिन्यात सरासरी दैनिक व्यवहार (Average Daily Transaction) 668 दशलक्ष राहिले, तर सरासरी दैनिक व्यवहार मूल्य (Average Daily Transaction Value) सप्टेंबरमधील 82,991 कोटींवरून वाढून 87,993 कोटी झाले.
या वाढीमागील कारणे
तज्ञांच्या मते, UPI व्यवहारांमध्ये झालेली ही मोठी वाढ मुख्यतः फेस्टिव्हल सीजनमुळे (सणासुदीचा काळ) झाली आहे. याशिवाय, ग्रामीण भागातही आता UPI चा स्वीकार वेगाने होत आहे, कारण डिजिटल पायाभूत सुविधांचा (Digital Infrastructure) विस्तार झाला आहे. जास्तीत जास्त व्यावसायिक आता QR कोडद्वारे पेमेंट स्वीकारत आहेत, ज्यामुळे भारत हळूहळू कॅशलेस इकॉनॉमीकडे (Cashless Economy) वाटचाल करत आहे.
IMPS आणि FASTag चा वापरही वाढला
ऑक्टोबर महिन्यात केवळ UPI च नव्हे, तर इतर पेमेंट पद्धतींमध्येही वाढ दिसून आली.
IMPS: IMPS व्यवहारांचे प्रमाण 3 टक्क्यांनी वाढून 40.4 कोटींपर्यंत पोहोचले. एकूण मूल्य 8 टक्क्यांनी वाढून 6.42 ट्रिलियन (लाख कोटी) झाले.
FASTag: FASTag चा वापर (Volume) 8 टक्क्यांनी वाढून 36.1 कोटी झाला. याचे एकूण मूल्य 4 टक्क्यांनी वाढून 6,686 कोटी झाले, जे सणासुदीच्या काळात हायवेवर त्याचा वाढता वापर दर्शवते.
हेही वाचा - Reverse Mortgage : घर विकण्याचे अन् भाडेकरूंचे संकट दूर; सरकारची 'ही' योजना घरावर देईल पगारासारखे मासिक उत्पन्न