Friday, March 13, 2026 07:42:37 AM

Middle East Tension : इराणच्या रडार यंत्रणेला निकामी करणारे अमेरिकेचे 'EA-18G Growler'; जाणून घ्या रिअल-टाइम माहिती देणारे हे प्रगत तंत्रज्ञान

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध कमालीचे भडकले असून, अमेरिकेने आपल्या सामर्थ्याचा पूर्ण वापर करण्यास सुरुवात केली आहे. या संघर्षात अमेरिकन नौदलाचे EA-18G Growler हे विमान गेमचेंजर ठरत आहे.

middle east tension  इराणच्या रडार यंत्रणेला निकामी करणारे अमेरिकेचे ea-18g growler जाणून घ्या रिअल-टाइम माहिती देणारे हे प्रगत तंत्रज्ञान

US EA-18G Growler aircraft technology and features : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध कमालीचे भडकले असून, अमेरिकेने आपल्या सामर्थ्याचा पूर्ण वापर करण्यास सुरुवात केली आहे. या संघर्षात अमेरिकन नौदलाचे EA-18G Growler हे विमान गेमचेंजर ठरत आहे. अमेरिकेने ही विमाने मध्यपूर्वेतील USS Abraham Lincoln आणि USS Gerald R. Ford या अजस्त्र विमानवाहू युद्धनौकांवर तैनात केली आहेत. हे केवळ एक लढाऊ विमान नसून, शत्रूची रडार यंत्रणा आंधळी करणारे एक फिरते 'इलेक्ट्रॉनिक युद्ध केंद्र' आहे.

शत्रूची माहिती रिअल-टाइम शेअर करण्याची क्षमता
EA-18G Growler ची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची नेटवर्किंग क्षमता. हे विमान शत्रूच्या सिग्नलची माहिती गोळा करून ती F-35 किंवा F-18 सारख्या लढाऊ विमानांना रिअल-टाइममध्ये पाठवते. यामध्ये Tactical Targeting Network Technology (TTNT) चा वापर करण्यात आला आहे. जेव्हा अशी 3 ग्राउलर विमाने एकत्र उडतात, तेव्हा ती शत्रूचा सिग्नल नेमका कोठून येतोय, याचा अचूक शोध लावतात. तसेच, INCANS सिस्टममुळे शत्रूचे सिग्नल जॅम करत असतानाही वैमानिक स्वतःच्या दलाशी सहज संवाद साधू शकतो.

प्रगत जॅमिंग आणि रडार यंत्रणा
हे विमान रडार जॅमिंगसाठी विशेषतः डिझाइन केलेले आहे. यात ALQ-99 आणि नवीन पिढीचे Next Generation Jammer (NGJ) पॉड्स वापरले जातात, जे शत्रूच्या दळणवळण यंत्रणेला पूर्णपणे विस्कळीत करतात. यात AN/APG-79 AESA रडार बसवण्यात आले आहे, जे जॅमिंग सुरू असतानाही शत्रूच्या लक्ष्याचा अचूक मागोवा घेऊ शकते. स्वसंरक्षणासाठी हे विमान AIM-120 AMRAAM आणि रडारविरोधी AGM-88 HARM क्षेपणास्त्रांनी सज्ज असते.

हेही वाचा - Video : पाकिस्तानात हाहाकार! मध्यरात्री लष्करी तळांवर भीषण हल्ला; रावळपिंडीसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त?

इराणविरुद्ध अमेरिकेचा 'तंत्रज्ञान' सराव
अमेरिकेने केवळ ग्राउलरच नव्हे, तर इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला छेद देण्यासाठी इतरही अत्याधुनिक विमाने तैनात केली आहेत:
F-22 Raptor: जगातील सर्वात प्रगत स्टिल्थ फायटर जेट, जे इराणच्या रडारला चकवा देऊन हल्ला करण्यास सक्षम आहे.
F-35 Lightning II: पाचव्या जनरेशनचे हे विमान गुप्त मोहिमांसाठी वापरले जात आहे.
B-2 Spirit Stealth Bomber: 'Operation Midnight Hammer' अंतर्गत या विमानांनी अमेरिकेतून थेट उड्डाण करत इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले केले आहेत.
E-3 Sentry (AWACS): आकाशातून संपूर्ण युद्धभूमीवर नजर ठेवण्यासाठी या विमानाचा वापर केला जात आहे.

हवेतील इंधन पुरवठा आणि देखरेख
युद्धाच्या मैदानात लढाऊ विमानांना अधिक काळ हवेत राहता यावे, यासाठी KC-46 Pegasus ही अत्याधुनिक टँकर विमाने हवेतच इंधन भरण्याचे काम करत आहेत. या सर्व तंत्रज्ञानामुळे अमेरिकेला इराणच्या लष्करी हालचालींची माहिती इराणच्या आधीच मिळत आहे. तंत्रज्ञानाच्या या लढाईत अमेरिकेने आपले वर्चस्व राखण्यासाठी इराणच्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक सिग्नलवर ग्राउलरच्या माध्यमातून नजर ठेवली आहे.

हेही वाचा - Aramco Refinery Attack: सौदी अरेबियाच्या अरामको रिफायनरीवर भीषण ड्रोन हल्ला; कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ


सम्बन्धित सामग्री