PM Kisan Yojana 21st Installment : देशात कोट्यवधी शेतकरी (Farmers) आहेत आणि त्यांच्या आर्थिक हितासाठी सरकार वेळोवेळी अनेक योजना राबवते. शेतकऱ्यांचे आर्थिक बळ वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.
21 वा हप्ता दिवाळीपूर्वी जमा होण्याची शक्यता
या योजनेचे आतापर्यंत 20 हप्ते (Installments) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आणि आता शेतकरी 21 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ताज्या माहितीनुसार, सरकार शेतकऱ्यांना लवकरच मोठी भेट देऊ शकते. दिवाळीपूर्वी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या योजनेबद्दल काय अपडेट्स समोर आले आहेत, ते जाणून घेऊया.
हप्ता कधी येऊ शकतो?
सरकारने सामान्यतः या योजनेचा पुढील हप्ता चार महिन्यांच्या अंतराने जारी करते. मागील म्हणजेच 20 वा हप्ता ऑगस्ट महिन्यात जारी झाला होता. अशा परिस्थितीत, नोव्हेंबर महिन्याच्या आसपास शेतकऱ्यांच्या 21 व्या हप्त्याची वेळ असते. मात्र, यंदा ऑक्टोबर महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना दिवाळीची भेट (Diwali Gift) म्हणून 21 वा हप्ता देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे, पुढील हप्ता दिवाळीपूर्वी म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, हप्ता जारी होण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
हेही वाचा - Agriculture Scheme 2025: शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘पीएम धन-धान्य कृषी योजना’ आणि ‘दलहन आत्मनिर्भरता मिशन’चा शुभारंभ
शेतकऱ्यांनी 'या' गोष्टींकडे लक्ष द्यावे
ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- ई-केवायसी (e-KYC) आवश्यक: लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे.
- माहिती दुरुस्त करा: अनेकदा चुकीचे बँक खाते किंवा अपुऱ्या माहितीमुळे हप्ता थांबतो. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांनी आपल्या खात्याचे तपशील, आधार कार्ड आणि ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. यामुळे हप्ता येण्यास विलंब होणार नाही.
शेतकरी अधिकृत वेबसाइट किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर (CSC Center) जाऊन आपली माहिती अपडेट करू शकतात. हप्त्याबद्दलचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर नियमितपणे तपासणी करत राहावी. हप्ता जारी होण्याची सर्वात पहिली माहिती याच वेबसाइटवर मिळेल.
हेही वाचा - Agriculture News: कृषी यांत्रिकीकरण योजनेत महत्त्वपूर्ण बदल, एक लाख रुपयांची मर्यादा रद्द