Saturday, February 14, 2026 04:02:13 AM

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीची दमदार खेळी; अंडर-19 वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीचा 'हा' विक्रम काढला मोडीत

वैभव सूर्यवंशीने भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला एका महत्त्वाच्या विक्रमात मागे टाकले असून, असा पराक्रम करणारा तो तिसरा सर्वात जलद भारतीय ठरला आहे.

vaibhav suryavanshi वैभव सूर्यवंशीची दमदार खेळी  अंडर-19 वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीचा हा विक्रम काढला मोडीत

Vaibhav Suryavanshi: आयसीसी अंडर-19 विश्वचषकात भारतीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या बॅटने नवा इतिहास रचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या गट फेरीच्या सामन्यात वैभवने आपल्या युवा एकदिवसीय (Youth ODI) कारकिर्दीतील 1,000 धावांचा टप्पा पूर्ण केला. यासह त्याने भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला एका महत्त्वाच्या विक्रमात मागे टाकले असून, असा पराक्रम करणारा तो तिसरा सर्वात जलद भारतीय ठरला आहे.

विराट कोहलीचा विक्रम मोडला

वैभव सूर्यवंशीने केवळ 20 डावांमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीने आपल्या 1,000 धावा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी विराट कोहलीने आपल्या युवा एकदिवसीय कारकिर्दीत 25 डावांत 978 धावा केल्या होत्या. वैभवने आता कोहलीला मागे सारून युवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सातव्या भारतीय खेळाडूचा मान मिळवला आहे. भारतासाठी सर्वात जलद 1,000 धावा पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत आता वैभव केवळ शुभमन गिल (13 डाव) आणि उन्मुक्त चंद (17 डाव) यांच्या मागे आहे.

हेही वाचा - WPL 2026: 'स्मृती'ब्रिगेडची विजयाची हॅट्ट्रिक; श्रेयांकाच्या फिरकीवर गुजरात जायंट्सचा 'क्लीन बोल्ड'

युवा एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज: 

युवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये (Youth ODI) भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता वैभव सूर्यवंशीने 1026 धावांसह मानाचे स्थान मिळवले आहे. या यादीत विजय झोल 1404 धावांसह अग्रस्थानी आहे, तर त्याच्यापाठोपाठ यशस्वी जयस्वालने 1386 धावा केल्या आहेत. तन्मय श्रीवास्तव 1316 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर असून, उन्मुक्त चंद आणि शुभमन गिल या दोघांनीही प्रत्येकी 1149 धावांची नोंद केली आहे. याशिवाय, सरफराज खानच्या नावावर 1080 धावा असून वैभव सूर्यवंशी आता या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

हेही वाचा - WPL Team 2026: सलग दोन विजयांसह स्मृती मंधानाची पलटण पहिल्या क्रमांकावर, तरी मुंबई इंडियन्ससमोर मोठे आव्हान

भारतीय संघाची खराब सुरुवात

एकीकडे वैभवने विक्रमी कामगिरी केली असली, तरी बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे केवळ 6 धावांवर बाद झाला, तर वेदांत त्रिवेदी शून्यावर माघारी परतला. विहान मल्होत्रालाही केवळ 7 धावा करता आल्या. 'सुपर सिक्स'मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या