बीड : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोपी वाल्मिक कराड याची पोलिस कोठडीची मागणी एसआयटीने केली होती. त्यानुसार मकोका गुन्ह्यातील आरोपी कराडला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बीड सत्र न्यायालयाने कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर बीड सत्र न्यायालयासमोर राडा झाला. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ अनेक घोषणाबाजी करण्यात आली तर कराडच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. एकंदरच काय तर देशमुख - कराड समर्थक आमनेसामने आले.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
बीड न्यायालयाने वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयाच्या सुनावणीनंतर एसआयटीने कराडला न्यायालयातून बाहेर आणल्यानंतर कोर्टाबाहेर राडा झाल्याचे पाहायला मिळाले. न्यायालयाबाहेर वकिलांचे दोन गट दिसून आले. त्यापैकी एका महिला वकिलाने वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा द्या अशी घोषणाबाजी केली. तर एका वकिलाने कराडवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याचे म्हणत त्याचे समर्थन केले.
हेही वाचा : धसांनी गुपित फोडलं