Vasubaras 2025: वसुबारस हा अश्विन महिन्यातील कृष्णपक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हटले जाते. यंदा वसुबारस 17 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी आहे.
वसुबारस पूजा मुहूर्त 2025
प्रदोषकाल मुहूर्त: 17.14 ते 19.43 पर्यंत
द्वादशी तिथी आरंभ- 17 ऑक्टोबर रोजी 11.12 वाजेपासून
द्वादशी तिथी समाप्ती: 18 ऑक्टोबर रोजी 12.18 मिनिटाला
वसुबारसचे महत्त्व
हिंदू धर्मात गाई अत्यंत पवित्र मानल्या जातात कारण त्या दुध देतात, जो पोषणाचा स्रोत आहे. महिला वसुबारसचे व्रत त्यांच्या मुलांच्या दीर्घायुष्य व कल्याण व्हावे यासाठी करतात. या दिवशी गाईचे पूजन करून, कामधेनू देवीची पूजा केली जाते. यामुळे समृद्धी मिळते. पुराणानुसार, जो व्यक्ती वसुबारस व्रत करतो, तो आपल्या पापांपासून मुक्त होतो.
हेही वाचा: Today's Horoscope 2025: 'या' राशींना नवीन संधी मिळू शकते, जाणून घ्या आजचे राशिभविष्य
कामधेनू देवी बद्दल
कामधेनू म्हणजे 'इच्छित सर्व चीज देणारी' देवी आहे. तिच्या रूपांमध्ये नंदा, सुनंदा, सुब्रि, सुमना आणि सुशीला अशी पाच रूपे आहेत.
वसुबारसची पूजा विधी
सकाळी भक्त भजन ऐकतात व घराभोवती दिवे लावतात. गाईंना अंघोळी घालतात, केशर, चंदन लावतात. रंगीबेरंगी वस्त्र, माळा व पुष्पांनी गाईंना सजवतात. धूपबत्त्या व एक दीप जाळतात. मंत्रोच्चारण करत पूजा करतात. गाई व वासरला नैवेद्य दाखवतात. काही लोक या दिवशी दूध, दही व तूप न घेण्याचा संकल्प घेतात. जर प्रत्यक्ष गाई दिसत नसतील तर मातीच्या गाई व वासराची प्रतिकृती करून त्यांची पूजा केली जाते किंवा गौशाळांना भेट देऊन गवत, मूग, गहू देणे हे चांगले समजले जाते. या दिवशी दिवसभर व्रत केले जाते आणि रात्री आरती केली जाते.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)