Malavya Rajyog 2025: नोव्हेंबर महिन्याची सुरुवात काही राशींसाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. कारण या महिन्याच्या प्रारंभी शुक्र ग्रह आपली स्थिती बदलत असून, त्यामुळे मालव्य राजयोग निर्माण होत आहे. वैदिक ज्योतिषानुसार, हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि तो निर्माण झाल्यास व्यक्तीच्या आयुष्यात धन, वैभव, कीर्ती आणि ऐश्वर्य येतं. यावेळी शुक्र ग्रहाच्या हालचालीमुळे काही विशिष्ट राशींना अनपेक्षित लाभ मिळू शकतो. चला पाहूया कोणत्या राशींचं भाग्य उजळणार आहे आणि या योगाचा त्यांच्यावर कसा परिणाम होईल.
धनु राशी
धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातोय. शुक्र ग्रह या राशीच्या अकराव्या भावात भ्रमण करणार आहे, जो लाभभाव म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या काळात उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. जुने गुंतवणुकीतून पैसा परत मिळेल आणि नवीन व्यवसायिक संधी उपलब्ध होतील. नोकरीत असलेल्या लोकांना बोनस किंवा प्रमोशनचा लाभ मिळू शकतो. तसेच, धनु राशीच्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ यशदायी ठरणार आहे. विशेषतः परदेशात उच्च शिक्षण घेण्याच्या संधी वाढतील.
मकर राशी
मकर राशीसाठी शुक्राचा हा संक्रमण काळ अत्यंत फलदायी ठरू शकतो. कारण शुक्र तुमच्या दहाव्या भावात स्थानापन्न होत आहे, जो व्यवसाय आणि करिअरचा भाव मानला जातो. त्यामुळे नोकरीत असलेल्या लोकांना बढती, नवा प्रोजेक्ट किंवा कामात कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक व्यक्तींना नवीन करार, व्यवहार आणि गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल. या काळात तुमचं सामाजिक स्थानही मजबूत होईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी देखील हा काळ अनुकूल आहे.
तूळ राशी
शुक्र हा तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ खास ठरणार आहे. मालव्य राजयोगामुळे तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक होईल आणि आत्मविश्वास वाढेल. अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. विवाहितांना वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढलेला जाणवेल. कुटुंबात सुसंवाद राहील आणि घरात एखादा शुभ समारंभ होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्याही लाभ होईल, विशेषतः ज्या लोकांचा व्यवसाय भागीदारीत आहे, त्यांना चांगला फायदा मिळेल.
नोव्हेंबरचा हा काळ मालव्य राजयोगामुळे अनेक राशींसाठी गोल्डन पीरियड ठरू शकतो. ज्यांच्या कुंडलीत शुक्र बलवान आहे, त्यांना धनलाभ, कीर्ती आणि वैभव मिळेल. पण, या काळात अति आत्मविश्वास टाळावा आणि निर्णय घेताना संयम बाळगावा, असं ज्योतिषतज्ज्ञांचं मत आहे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)