मुंबई : व्होट जिहादचे उत्तर, बटेंगे तो कटेंगे हे असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. लोकसभा निवडणुकीत काही उमेदवारांना पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली. पण एका विधानसभा मतदारसंघात त्यांची पिछेहाट झाली. ज्या मतदारसंघात आघाडी मिळाली तिथे सर्वांनी मतदान केले नव्हते. पण जिथे पिछेहाट झाली तिथे ठरवून एकगठ्ठा मतदान झाले. हा व्होट जिहाद आहे. या व्होट जिहादला बटेंगे तो कटेंगे हे उत्तर असल्याचे विनोद तावडे म्हणाले.
विनोद तावडेंच्या मुलाखतीतले महत्त्वाचे मुद्दे
भाजपा नेता विनोद तावडे यांची विशेष मुलाखत
बोरीवलीत विनोद तावडेंची शिष्टाई फळाला
'बोरीवलीत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती'
'सरवणकर मागे हटल्यास उबाठाला फायदा होईल'
'मलिकांची उमेदवारी हा राष्ट्रवादीचा प्रश्न'
'एका जागेसाठी महायुती तोडणं योग्य नाही'
'मलिकांच्या मंत्रीपदाचा प्रश्न फार पुढचा'
तेव्हाचं तेव्हा बघू, मलिकांच्या मंत्रीपदावर तावडेंचे उत्तर
'पहाटेचा शपथविधी पवारांच्या संमतीनेच'
'याआधी दोनदा राष्ट्रवादीसोबत युतीसाठी चर्चा'
'उद्धव ठाकरे गद्दारी करून काँग्रेससोबत गेले'
'उद्धव ठाकरेंच्या निर्यणामुळे बाळासाहेबांना यातना'
'जनादेशाशी गद्दारी उद्धव ठाकरेंनीच केली'
'उद्धव ठाकरे भाजपापासून कायमचे दुरावले'
'भाजपा नेहमीच मराठा आरक्षणाच्या बाजूने'
'भाजपाने मराठ्यांना आरक्षण दिले, उच्च न्यायालयात टिकवले'
'मविआने मराठ्यांचे आरक्षण घालवले'
'महायुतीने मुलभूत सुविधांवर काम केले'
'लाडक्या बहिणी महायुतीच्याच बाजूने'
व्होट जिहादचा प्रभाव विधानसभेतही पडेल ?
'व्होट जिहादचे उत्तर, बटेंगे तो कटेंगे'
'अर्बन नक्षलवाद्यांकडून विकासकामांना विरोध'
'देशाच्या विकासाविरोधात अर्बन नक्षलवाद'
'उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर'
'पंचवीस कोटी जनता दारिद्ररेषेच्या वर आली'
'संघाचा आशिर्वाद आम्हाला हवाच आहे'