ढाका : बांगलादेशातील हिंसाचाराचा कांद्याला फटका बसला आहे. भारतातून बांगलादेशला जात असलेले कांद्याचे ट्रक सीमेवर अडकले आहेत. सीमेवर अडकलेल्या ट्रकची संख्या ८० च्या घरात आहे.
भारत सरकारने बांगलादेशमध्ये ८० हजार टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. या परवानगी नंतर भारतातून कांद्याचे ट्रक बांगलादेशला जाण्यास सुरुवात झाली. ताज्या घडामोडींमुळे बांगलादेशच्या सीमेवर ट्रक अडकले आहेत. परिस्थिती नियंत्रणात नसल्यामुळे ट्रक अद्याप बांगलादेशमध्ये गेलेले नाहीत. यामुळे कांदे गोदामात पोहोचण्याआधी खराब होण्याचा धोका आहे. शिवाय ट्रक अडकल्यामुळे खर्चात वाढ झाली आहे.