Viral Video : एक तरुण आग लागलेल्या इमारतीत अडकला होता. त्याची आई इमारतीच्या खाली उभी होती. ती लेकराला वाचवण्यासाठी कळवळून देवाचा धावा करत होती. अखेर या मुलाला मदत मिळाली आणि तो त्या संकटातून सुखरूप बाहेर पडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल.
आई आणि मुलाचे नाते सर्व नात्यांच्या पलीकडचे असते. जगात सर्व काही मिळेल, पण आईची माया, ममता आणि लेकरासाठी काहीही करण्याची ऊर्जा इतर कुठे मिळणार नाही. आई एखाद्या प्रसंगी हतबल असेल आणि स्वतः काही करू शकत नसेल, तरी तिच्याकडे श्रद्धेची आणि प्रार्थनेची ताकद असतेच. देवही अशा आईच्या हाकेला 'ओ' द्यायला तत्पर असतो. अशाच एका आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आईचा मुलगा आगीच्या विळख्यात सापडलेल्या उंच इमारतीवर अडकून पडला आहे. या आईजवळ प्रार्थना करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. सतत वाहत असलेल्या डोळ्यांनी मुलाकडे पहात-पहात ती परमेश्वराला विनवत आहे. तिच्या जिवाची घालमेल पाहून कोणीही भावुक होईल. अखेर या मुलाला मदत मिळते आणि तो या मृत्यूच्या दाढेतून बाहेर येतो. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
हेही वाचा - VIDEO: पालकांनो, मुलांना कुत्र्यांपासून दूर ठेवा; चिमुकल्याचा हा व्हिडिओ पाहून पायाखालची जमीन सरकेल!
मुलगा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका इमारतीला आग लागलेली दिसेल. या इमारतीत अडकलेल्या लोकांना सुरक्षा रक्षक बाहेर काढताना दिसत आहे. इमारतीच्या खाली लोकांची गर्दी दिसून येत आहे. या गर्दीत एक आई देवाला प्रार्थना करताना दिसत आहे. तिचा मुलगा या इमारतीत अडकला आहे. पुढे या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की सुरक्षा रक्षक हॅलिकॉप्टरच्या मदतीने त्या तरुणाला इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरून बाहेर काढताना दिसतात. तो मुलगा हेलिकॉप्टरमध्ये बसेपर्यंत त्याच्या आईच्या जिवात-जीव येत नाही. तरुण सुरक्षित हॅलिकॉप्टरमध्ये बसताच खाली उभे असलेले लोक टाळ्या वाजवतात. प्रार्थना करणारी आई भावुक झालेली दिसते. व्हिडीओवर लिहिलेय, “देवाचं पण काही चालत नाही एका आईच्या ताकदीपुढे”
हेही वाचा - माकडानं दीड लाखांचा मोबाईल फोन पळवला; 'बिरबलाच्या बुद्धीनं केली युक्ती', व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू
marathi_parva या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर्वप्रथम अभिनंदन हेलिकॉप्टर पायलटचे” तर एका युजरने लिहिलेय, “आईचे ऐकले देवाने” आणखी एका युजरने लिहिलेय, “आई….. सगळे विषय इथे येऊन थांबतात” एक युजर लिहितो, “म्हणून म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” तर एक युजर लिहितो, “आई ती आईच असते देवाला पण आई ची गरज असते म्हणुन तिची प्रार्थना कधी वाया जात नाही आपल्या लेकरासाठी” अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.