Sunday, November 16, 2025 06:26:35 PM

IPL 2026: विराट कोहली आता IPL मध्ये RCB कडून खेळणार नाही? लिलावापूर्वी करारावर स्वाक्षरी करण्यास दिला नकार

लिलावापूर्वी विराट कोहलीने आरसीबीसोबत व्यावसायिक करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याचे वृत्त समोर आले.

ipl 2026 विराट कोहली आता ipl मध्ये rcb कडून खेळणार नाही लिलावापूर्वी करारावर स्वाक्षरी करण्यास दिला नकार

IPL 2026: विराट कोहली आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळणार आहे की नाही, याबाबत सध्या चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळतोय. लिलावापूर्वी विराट कोहलीने आरसीबीसोबत व्यावसायिक करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याचे वृत्त समोर आले. ज्यामुळे अनेकांनी तो संघ सोडणार आहे किंवा आयपीएलमधून निवृत्त होणार आहे, असा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. 

हेही वाचा - Smriti Mandhana : स्मृती मानधनाने रचला इतिहास, इतक्या धावा करणारी ठरली पहिलीच फलंदाज

खरं तर विराट कोहलीने फक्त व्यावसायिक करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. याचा अर्थ असा नाही की तो आरसीबी सोडत आहेत. खेळाडू करार आणि व्यावसायिक करार यात फरक असतो. खेळाडू करार म्हणजे आयपीएलमध्ये खेळण्यासाठीची अधिकृत नोंदणी, तर व्यावसायिक करार म्हणजे फ्रँचायझीच्या प्रायोजकांसोबत किंवा जाहिरातींसोबत संबंध जोडण्याची प्रक्रिया. विराटने केवळ दुसऱ्या ब्रँडसोबतच्या व्यावसायिक करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे, परंतु आयपीएलमधील त्याचा आरसीबीसोबतचा खेळ सुरू राहणार आहे.

हेही वाचा - Shubman Gill Net Worth: शुभमन गिल आहे करोडो रुपयांचा मालक; त्याचे वार्षिक उत्पन्न ऐकून तुम्हीही व्हाल अवाक

आरसीबी फ्रँचायझी विविध प्रायोजकांसोबत काम करते, ज्यामध्ये खेळाडूंनी लीगदरम्यान व्हिडिओ बनवणे, जाहिराती करणे अशा बाबींचा समावेश असतो. विराट कोहलीने यासाठी नकार दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे, पण त्यांनी कोणत्या ब्रँडशी संबंध न जोडण्याचा निर्णय घेतला आहे, याची माहिती अजून स्पष्ट नाही. यामुळे चाहत्यांनी घाबरून न जाता समजून घेतले पाहिजे की विराट कोहली आरसीबी सोडत नाहीत. आयपीएल 2026 मध्ये देखील तो आरसीबीकडूनच खेळताना दिसेल. केवळ व्यावसायिक व्यवहाराबाबत निर्णय घेतला आहे, त्यामुळे संघाबरोबर त्याचा संबंध कायम राहील. 


सम्बन्धित सामग्री