Wednesday, December 11, 2024 12:09:48 PM

Bharat Scouts and Guides
भारत स्काउट्स आणि गाइड्सचे दिल्लीत वॉकथॉन

भारत स्काउट्स आणि गाइड्सने हिरक महोत्सवी स्थापना दिन आणि ध्वज दिनानिमित्त दिल्लीत वॉकथॉनचे अर्थात चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते.

भारत स्काउट्स आणि गाइड्सचे दिल्लीत वॉकथॉन

नवी दिल्ली : भारत स्काउट्स आणि गाइड्सने हिरक महोत्सवी स्थापना दिन आणि ध्वज दिनानिमित्त दिल्लीत वॉकथॉनचे अर्थात चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. इंडिया गेट ते भारत स्काउट्स आणि गाइड्सचे मुख्यालय असा या स्पर्धेचा मार्ग होता. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता स्पर्धेची सुरुवात झाली. स्पर्धेत एकूण ३३४ सदस्य सहभागी झाले. भारत स्काउट्स आणि गाइड्सच्या हिरक महोत्सवाचा आरंभ म्हणून वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 

'सशक्त युवा, विकसित भारत' या संकल्पने अंतर्गत दिल्लीत वॉकथॉन झाली. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, केंद्रीय विद्यालय येथील स्काउट्स, गाइड्स, रोवर्स, रेंजर्स, युनिट लीडर्स आणि भारत स्काउट्स आणि गाइड्सचे अधिकारी उत्साहाने एकत्र आले. त्यांच्या समर्पणातून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीची त्यांची बांधिलकी दिसून आली.

सकाळी ७ वाजता हरियाणा राज्याच्या क्रीडा मंत्रालयातील गौरव गौतम यांनी वॉकेथॉनला झेंडा दाखवला. भारत स्काउट्स आणि गाइड्सचे मुख्य राष्ट्रीय आयुक्त डॉ. के. के. खंडेलवाल स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. स्पर्धक सकाळी आठ वाजता लक्ष्मी मजुमदार भवन, राष्ट्रीय मुख्यालय येथे पोहोचले. यानंतर विशेष सोहळ्याला सुरुवात झाली. कार्यक्रमात पाहुण्यांनी सहभागींचा उत्साह, एकसारखेपणा, शिस्तबद्ध मिरवणूक आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन याचे कौतुक केले वॉकथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी दिल्ली राज्य प्रशासन,  केंद्र सरकार, दिल्ली पोलीस, सीबीआय यांचे आयोजकांनी आभार मानले. सेंट जॉन अॅम्ब्युलन्सने वॉकथॉनसाठी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सेवांची व्यवस्था केली होती. वॉकथॉनचे नेतृत्व बीएसजीचे कार्यकारी संचालक अमर बी. छेत्री यांनी केले, तर बीएसजीच्या संचालिका दर्शना पावसकर यांनी सहभागी सदस्यांना प्रोत्साहन दिले.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo