मुंबई : वैतरणा जलवाहिनीच्या ९०० मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. धरणामधून पाणी वाहून नेणारी यंत्रणा अंशतः बंद पडली आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रास होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये ५ ते १० टक्के घट झाली. दुरूस्ती कामासाठी सुमारे ४८ तास इतका कालावधी अपेक्षित आहे. संपूर्ण मुंबई कार्यक्षेत्रात ५ ते १० टक्के पाणीकपात केली आहे. मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी तांत्रिक अडचणीमुळे पाणीकपात केली आहे. मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.