नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये तुर्भे इंदिरानगर विभागात पाच दिवसांपासून पाणीटंचाई सुरू आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली आहे. टँकरद्वारे पाणी मागविले जात असून, पाणी पुरवठा तत्काळ सुरू करण्याची मागणी एमआयडीसीकडे केली आहे.
औद्योगिक वसाहतीमधील कारखाने, हॉटेल व सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मागील पाच दिवसांपासून तुर्भे इंदिरानगर परिसरातील पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे.